Home स्पोर्ट्स दक्षिण कोरिया येथील,  सोळाव्या जागतिक तायक्वॅान्डो कल्चरल एक्सपो’ २०२३ या स्पर्धेसाठी जेएसटीएआरसी कोल्हापूरचा संघ रवाना

दक्षिण कोरिया येथील,  सोळाव्या जागतिक तायक्वॅान्डो कल्चरल एक्सपो’ २०२३ या स्पर्धेसाठी जेएसटीएआरसी कोल्हापूरचा संघ रवाना

2 second read
0
0
49

no images were found

दक्षिण कोरिया येथील,  सोळाव्या जागतिक तायक्वॅान्डो कल्चरल एक्सपो’ २०२३ या स्पर्धेसाठी जेएसटीएआरसी कोल्हापूरचा संघ रवाना

कोल्हापूर : जेएसटीएआरसी ही कोल्हापुरातील स्वसंरक्षणासाठी तायक्वॅान्डोचे प्रशिक्षण देणाऱ्या या नामांकित संस्थेच्या वार्षिक कार्यक्रमाचा भाग म्हणून  जेएसटीएआरसी “कोरियाफेस्ट” अंतर्गत दक्षिण कोरीया येथील आंतरराष्ट्रीय तायक्वॅान्डो कार्यक्रमात दरवर्षी सहभागी होते व विद्यार्थ्यांना तायक्वॅान्डो मधील विविध स्पर्धांचे प्रशिक्षण व सहभागी होण्याची संधी देते.

यावर्षी या संस्थेच्या कोल्हापूर शाखेतील दोन विद्यार्थी श्री.अभिनव शेटे व कु.निखिल माने आणि त्यांचे मार्गदर्शक व कोल्हापूर संस्थेचे प्रमुख प्रशिक्षक अमोल भोसले यांच्याबरोबर या स्पर्धेत सहभागी होत आहेत. कोल्हापूरचा संघ हा या मुख्य संघाच्या इतर सदस्यांच्या बरोबरीने दक्षिण कोरिया येथील स्पर्धेत सहभागी होऊन भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
ही स्पर्धा कोरियातील तायक्वॅान्डो शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तायक्वॅान्डो वॉन , मुजु पार्क ,जलाबोकदो राज्य , या जगातील प्रथम क्रमांकाच्या भव्य तायक्वॅान्डो क्रीडा संकुला मध्ये पार पडणार आहे.
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्याबरोबरच इतर उच्च प्रशिक्षण यात फाइट, पुमसे, स्वसंरक्षण आणि आत्मरक्षा यांचे प्रशिक्षण ही घेता येणार आहे. या स्पर्धा दि. 17 ऑगस्ट ते २५ ऑगस्ट , २०२३ या दरम्यान
द. कोरिया येथे संपन्न होणार आहेत.  
तसेच कोरियायील जागतिक तायक्वॅान्डो मुख्य प्रशिक्षण केंद्रास भेट देणार आहे. कोरिया स्पर्धेतील सहभाग म्हणजे तेथील तायक्वॅान्डो प्रशिक्षण , माहिती आत्मसात करण्याबरोबरच जागतिक  हेड क्वार्टर (कुक्कीवॉन) पाहण्याची अत्यंत दुर्मिळ संधी या संघास मिळणार आहे.
या संघास जेएसटीएआरसी चे प्रमुख आणि तायक्वॅान्डो तज्ज्ञ मास्टर निलेश जालनावाला यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले आहे.

Load More Related Articles

Check Also

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम कोल्हापूर/ प्रतिनिधी:-…