Home सामाजिक  महिंद्रा ओजा  सज्ज; क्रांतिकारक स्वरुपाचे हलक्या वजनाचे फोर-व्हील ड्राईव्ह प्रकारचे ७ ट्रॅक्टर्स सादर

 महिंद्रा ओजा  सज्ज; क्रांतिकारक स्वरुपाचे हलक्या वजनाचे फोर-व्हील ड्राईव्ह प्रकारचे ७ ट्रॅक्टर्स सादर

46 second read
0
0
41

no images were found

 महिंद्रा ओजा  सज्ज; क्रांतिकारक स्वरुपाचे हलक्या वजनाचे फोर-व्हील ड्राईव्ह प्रकारचे ७ ट्रॅक्टर्स सादर

 

सब कॉम्पॅक्ट, कॉम्पॅक्ट आणि स्मॉल युटिलिटी या ओजा श्रेणीतील तीन नव्या प्लॅटफॉर्म्सवर महिंद्राने नवीन ट्रॅक्टर्सचे अनावरण येथे केले. बाजारपेठेच्या विविध गरजा लक्षात घेऊन ही उत्पादने सादर करण्यात आली आहेत. यांमध्ये फोर-व्हील ड्राईव्ह (४डब्ल्यूडी) स्वरुपातील, कॉम्पॅक्ट आणि स्मॉल युटिलिटी श्रेणीमधील ट्रॅक्टर्सची ७ नवीन मॉडेल्स खास भारतीय बाजारपेठेसाठी सादर करण्यात आली. ही मॉडेल्स २० एचपी ते ४० एचपी (१४.९१ केडब्ल्यू ते २९.८२ केडब्ल्यू) या ताकदीची आहेत. विविध अॅप्लिकेशन्ससाठी आणि शेतीतील विविध कामांसाठी या अष्टपैलू प्लॅटफॉर्म्सचा उपयोग होण्यासारखा आहे.

 ओजा ही श्रेणी सर्वप्रथम भारतात सादर करण्यात येत असून यानंतर ती उत्तर अमेरिका, आसियान गटातील देश, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, युरोप आणि सार्क प्रदेशात सादर केली जाईल. २०२४ मध्ये थायलंडमध्ये महिंद्रा पदार्पण करणार आहे व तेथून हा समूह आसियान प्रदेशातही प्रवेश करील.

 नवीन ओजा ट्रॅक्टर श्रेणीच्या सादरीकरणाप्रसंगी बोलताना ‘महिंद्रा अँड महिंद्रा’च्या ‘फार्म इक्विपमेंट सेक्टर’चे प्रमुख हेमंत सिक्का म्हणाले, “हलक्या वजनाच्या ट्रॅक्टरची नवीन ओजा श्रेणी ही प्रगतीशील शेतकऱ्यांसाठी उर्जेचे पॉवरहाऊस आहे. नाविन्यता आणि तंत्रज्ञान यांचा संयोग असलेल्या ओजा ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून महिंद्रा युरोप आणि आसियान गटातील देशांमध्ये नव्याने प्रवेश करणार आहे, तसेच त्यामुळे जागतिक ट्रॅक्टर उद्योगातील २५ टक्के हिस्साही काबीज करू शकणार आहे. चपळ, हलक्या वजनाचे, फोर-व्हील ड्राईव्ह स्वरुपाचे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे हे ७ ट्रॅक्टर्स भारतात सादर करून आम्ही जगभरातील शेतीत क्रांती घडवून आणण्याच्या आमच्या वचनबद्धतेला मूर्त रूप देत आहोत.”

 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…