Home शैक्षणिक बी.एस्सी. बी.एड. एकात्मिक अभ्यासक्रमास प्रारंभ

बी.एस्सी. बी.एड. एकात्मिक अभ्यासक्रमास प्रारंभ

3 second read
0
0
259

no images were found

बी.एस्सी. बी.एड. एकात्मिक अभ्यासक्रमास प्रारंभ

कोल्हापूर,(प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागात बी.एस्सी. बी.एड्. (आय.टी.ई.पी.) अभ्यासक्रमाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रा. पाटील म्हणाले, योग्य मार्गदर्शन, जिज्ञासा, संशोधक वृत्ती व अभ्यासामध्ये सातत्य ठेवल्यास विद्यार्थी आपले ध्येय नक्कीच गाठू शकतात. शिक्षणशास्त्र आधिविभागाच्या प्रमुख डॉ. चेतना प्र.सोनकांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बी.एस्सी. बी.एड्. (इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम) अभ्यासक्रमाच्या समन्वयक डॉ. रूपाली संकपाळ यांनी अभ्यासक्रमाविषयी माहिती दिली. राजनंदिनी यांनी सूत्रसंचालन केले, तर निशांत कुमार यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. मोहम्मद कौनेन रझा यांनी आभार मानले.यावेळी डॉ. अंजली गायकवाड,  सारिका पाटील, साबिया बागवान,  संगीता चंदनवाले, संजना भालकर,  संगीता माने,  अतुल जाधव यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

हिंदु विधीज्ञ परिषदेची अभिनेत्री स्वरा भास्कर अहमद यांना कायदेशीर नोटीस !

हिंदु विधीज्ञ परिषदेची अभिनेत्री स्वरा भास्कर अहमद यांना कायदेशीर नोटीस !   &nbs…