no images were found
‘ग्राम विकासातील यशस्वी प्रयोग’ या विषयावर चर्चासत्र’
कोल्हापूर (प्रतीनिधी) : स्थानिक गरजा आणि अनुभवाधारित बहु पीक मॉडेल हे सध्याच्या काळाची गरज यशवंतराव चव्हाण अध्यासनाचे वतीने आयोजित ‘ग्रामविकासातील यशस्वी प्रयोग’ या चर्चासत्रामध्ये श्री गोरक्षनाथ भांगे यांचे प्रतिपादन.
यशवंतराव चव्हाण अध्यासन, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्यामार्फत ‘ग्रामविकासातील यशस्वी प्रयोग’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र दि. ११ जानेवारी २०२४ रोजी अर्थशास्त्र अधिविभागाच्या सेमिनार हॉल येथे आयोजित करण्यात आले होते श्री. गोरक्षनाथ भांगे ‘आरोग्यदायी स्वयं पोशी ३ गुंठा ७५ पिके शेती प्रयोग’ या विषयांतर्गत सध्याच्या काळातील शेती संवर्धनाची गरज आणि अन्न सुरक्षेच्या जाणिवा आणि उणिवा अगदी ओघवत्या शैलीमध्ये विद्यार्थ्यांसमोर मांडल्या तर श्री. वसंत वासकर यांनी ‘मधाचे गाव- पाटगाव मॉडेल’ याबाबत मधुमक्षिका पालन व मध संकलन याचे प्रात्यक्षिक दाखवून या प्रकल्पाची माहीती दिली. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ . व्ही. एन. शिंदे हे होते, अध्यक्षीय मनोगतामध्ये सरांनी शाश्व्त विकास आणि यामध्ये ग्रामीण विकासाचा अभ्यास करणाऱ्या विध्यार्थींची भूमिका
याबाबत मार्गदशन केले. या कार्यक्रमाला अधिविभागातील सर्व प्राध्यापक आणि विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन डॉ उर्मिला
दशवंत, सहायक प्राध्यापक यांनी, प्रास्ताविक यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे प्रभारी संचालक डॉ. नितीन माळी यांनी केले तर आभार यशवंतराव
चव्हाणअध्यासनाचे समन्वयक डॉ. उमेश गडेकर यांनी मानले .