Home शैक्षणिक रविवारी 28 केंद्रावर होणार महाटीईटी परीक्षा  

रविवारी 28 केंद्रावर होणार महाटीईटी परीक्षा  

7 second read
0
0
32

no images were found

रविवारी 28 केंद्रावर होणार महाटीईटी परीक्षा

 

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडून दि. 10 नोव्हेंबर 2024 रोजी शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून कोल्हापूर मध्ये 28 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण उमेदवार हे इयत्ता पहिली ते आठवीपर्यत शिक्षक भरतीसाठी पात्र ठरवले जाणार आहेत. या परीक्षेसाठी पहिल्या पेपरसाठी 6 हजार 103 तर दुस-या पेपरसाठी 9 हजार 677 इतक्या उमेदवारांनी आपली आवेदनपत्रे भरली आहेत. परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही यासाठी प्रशासन दक्ष राहणार असून एकूण सात झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी दिली आहे.

 सहायक परिरक्षक हे 28 परीक्षा केंद्रावर बैठे पथक म्हणून कामकाज पाहणार आहेत. तसेच प्रत्येक वर्ग खोलीवर सीसीटीव्ही कॅमे-याची नजर राहणार आहे.सध्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची प्रक्रिया सुरु असून या दिवशी परीक्षा केंद्र परिसरात कोणत्याही राजकीय पक्षास परीक्षा वेळेत राजकीय सभेस परवानगी दिली नसल्याने परीक्षार्थ्यांना परीक्षेवेळी कोणताही त्रास होणार नाही, परीक्षेचे संनियंत्रण नियमानुसार शिस्तबध्द होण्यासाठी जिल्हा संनियत्रण व आयोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतली असून बैठकीस गृह पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, कोल्हापूर महानगरपालिका उपायुक्त (१) साधना पाटील, डाएट कोल्हापूरचे प्राचार्य डॉ. राजेंद्र भोई, प्राथमिक शिक्षणाधिकारी तथा सदस्य सचिव मीना शेंडकर, उप शिक्षणाधिकारी (माध्य) दिगंबर मोरे, उपशिक्षणाधिकारी (योजना) चेतन शिंदे, उपशिक्षणाधिकारी (प्राथ) तथा जिल्हा परिरक्षक शंकर यादव, शिक्षण विस्तार अधिकारी रविंद्र ठोकळ, सरीता वाठारकर कनिष्ठ सहायक उपस्थित होते.

परीक्षेचे आयोजन सुव्यवस्थिात होण्यासाठी पुरेसा व हत्यारी पोलीस बंदोबस्त देण्याबाबतची सूचना जिल्हाधिकारी यांनी पोलीस यंत्रणेस दिली. पेपर एक व दोन साठी एकूण 28 परीक्षा केंद्रे असून सात झोनल ऑफीसर, 28 परीक्षा केंद्र संचालक, 4 उपकेंद्र संचालक, 28 सहायक परीरक्षक, एक जिल्हा परिरक्षक, 87 पर्यवेक्षक, 423 समवेक्षक, 58 लिपिक, 116 सेवक असा सुमारे 752 इतके अधिकारी, कर्मचारी परीक्षा कामकाज पाहणार आहेत. या सर्व परीक्षा कामकाजाचे व्हिडीओ शुटींग करण्यात येणार आहे. परीक्षेसाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (योजना) यांची भरारी पथके नेमली आहेत.

उमेदवारांसाठी सूचना- पेपर क्रं. 1 ची वेळ सकाळी 10 ते दुपारी 1 अशी असून सकाळी 9 वाजता परीक्षा केंद्राच्या प्रवेशव्दारावर परीक्षार्थीची तपासणी घेण्यात येऊन परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात येईल. दुस-या पेपरची वेळ दुपारी 2 ते सायंकाळी  5अशी असून दुपारी 1.15 पासून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.

परीक्षार्थी परिक्षा सुरु होण्यापूर्वी किमान 20 मिनिटे अगोदर परीक्षा गृहात येतील. त्यानंतर कोणत्याही उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेसाठी भरारी पथके नेमली असून ते आकस्मिक भेटी देऊन परीक्षेतील गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता घेणार आहेत. तसेच गैरप्रकार करणा-यांविरुध्द परीक्षेमध्ये होणा-या गैरप्रकाराना प्रतिबंध करण्याबाबतचे व अधिनियम 1982 व भारतीय दंडसंहिता मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल.

 परीक्षा केंद्रे खालील प्रमाणे-

महाराष्ट्र हायस्कूल व न्यू कॉलेज, एस.एम. लोहिया हायस्कूल, विवेकांनंद कॉलेज, प्रायव्हेट हायस्कूल, छत्रपती शाहू विद्यालय न्यू पॅलेस, न्यू हायस्कूल पेटाळा, न्यू मॉडेल इंग्लि्श स्कूल, प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, उषाराजे हायस्कूल (केंद्र क्रं.1), उषाराजे हायस्कूल (केंद्र क्रं.2), छत्रपती राजाराम हायस्कूल क. बावडा, सेंट झेव्हियर्स हायस्कूल, शाहू कॉलेज सदर बाजार, शहाजी कॉलेज, महावीर कॉलेज, श्री व.ज. देशमुख हायस्कूल, गोखले कॉलेज, रा.छ.शाहू महाराज हायस्कूल जुना बुधवार, शिलादेवी शिंदे हायस्कूल, एम.एल.जी. हायस्कूल, उषाराजे हायस्कूल (कमला कॉलेज) नेहरु हायस्कूल दसरा चौक, आर्यविन ख्रिश्चन हायस्कूल, देशभुषण हायस्कूल, नागोजीराव पाटणकर हायस्कूल, एस. के. पंत वालावलकर हायस्कूल, कोरगावकर हायस्कूल, दादासाहेब मगदूम हायस्कूल कोल्हापूर

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…