
no images were found
हर घर तिरंगा अभियानाच्या जन जागृतीसाठी भाजपा युवा मोर्चाच्यावतीने तिरंगा बाईक रॅली
कोल्हापूर : देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली.या अमृत महोत्सवाचा समरोप म्हणून देशभर विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.त्याच कार्यक्रमातील एक भाग म्हणून हर घर तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी शहरातील प्रमुख मार्गावरून आज भारतीय जनता युवा मोर्चातर्फे तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन केले होते. दसरा चौक येथून छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून रॅली ची सुरुवात करण्यात आली.
वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.
शाळकरी मुलीकडे तिरंगा ध्वज देऊन भारत मातेची वेशभूषा करण्यात आली होती.
दसरा चौक मार्गे सुरू झालेली बाईक रेली पुढे बिंदू चौक, मिरज तिकटी, खरी कॉर्नर, पापाची तीकटी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीची सांगता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून करण्यात आली.
यावेळी रॅलीला संबोधित करताना भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी गेल्या ९ वर्षाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या गरीब कल्याणकारी योजनांचा व विकासकामांच्या मुळेच हा अमृत महोत्सव खऱ्या अर्थाने साजरा होत असल्याचे सांगितले.
युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विजयसिंह खाडे पाटील यांनी प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवून हर घर तिरंगा अभियान यशस्वी करावे असे आवाहन केले.
यावेळी विराज चिखलीकर, सुनील पाटील, अमेय भालकर, विवेक वोरा, प्रदीप घाडगे, गौरव सातपुते, विशाल शिराळकर, गिरीश साळोखे, प्रसाद पाटोळे यांच्यासह दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, अमोल पालोजी, विजय अग्रवाल,
संजय सावंत, राजू मोरे, सुधीर बोलावे, रवींद्र मुतगी, विवेक कुलकर्णी, भरत काळे, सुभाष रामुगडे, अप्पा लाड, अनिल कामत यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.