Home मनोरंजन ‘अभिनेता पारस कलनावटकडे तब्बल 380 जोड्या बुटांच्या चे कलेक्शन

‘अभिनेता पारस कलनावटकडे तब्बल 380 जोड्या बुटांच्या चे कलेक्शन

2 second read
0
0
27

no images were found

‘अभिनेता पारस कलनावटकडे तब्बल 380 जोड्या बुटांच्या चे कलेक्शन

प्रसारणास प्रारंभ केल्यापासूनच ‘कुंडली भाग्य’ मालिकेने प्रेक्षकांना मोहवून टाकले आहे. ‘बालाजी टेलिफिल्म्स’ची निर्मिती असलेल्या या मालिकेतश्रध्दा आर्य (प्रीता), शक्ती आनंद (करण), मनित जौरा (ऋषभ), पारस कलनावट (राजवीर), सना सय्यद (पालकी) आणि बसीर अली (शौर्य) या लोकप्रिय कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या कौटुंबिक मालिकेच्या कथानकाने अनेक भावभावना जागृत केल्या असून मानवी नातेसंबंधांतील गुंतागुंतीचा वेध घेतला आहे. मालिकेच्या आगामी भागांमध्ये राजवीरने आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शौर्य पोलिसांकडे करताना प्रेक्षकांना दिसेल. राजवीरचा खटला न्यायालयात पोहोचतो, तेव्हा पुढे काय होईल, याबद्दल सर्वजणांच्या मनात प्रचंड उत्कंठा दाटून येईल.

पारस कलनावट म्हणाला, “जीवन इतकं लहान आहे की रोज तेच तेच बूट घालण्यात दिवस फुकट घालविणं योग्य नव्हे. माझ्याकडे बुटांच्या तब्बल 380 जोड्या असून त्यांच्यासाठी मी खास कपाट तयार केलं आहे. ती माझी घरातील अत्यंत आवडती जागा आहे. 2014 पासून मला विविध प्रकारचे बूट विकत घेण्याचं वेड लागलं. पण माझी ही आवड तब्बल 380 बुटांच्या जोड्यांच्या कलेक्शनमध्ये रुपांतरित होईल, याची मलाही कल्पना नव्हती. यातील प्रत्येक जोडी ही माझी वेगळी ओळख करून देते. प्रत्येक जोडी ही दुसर्‍्यापेक्षा अगदी वेगळी आहे. माझ्या मते एखादी व्यक्तिरेखा जसजशी विकसित होते, तसतशी माझ्याकडील बुटांचं कलेक्शन विकसित होत असतं. त्यांच्यात अनेक आठवणी गुंतलेल्या असताता. प्रत्येक जोडी माझ्यात नवा बदल घडविते. हे केवळ बूट नाहीयेत, ते माझ्या आत्म्याच्या वाटचालीच्या पाऊलखुणा आहेत. त्यामुळे रोज एक नवं स्टायलिश पाऊल टाकीत पुढे जात राहीन.”

वा, ही खरोखरच नवलाईची गोष्ट आहे! पारसकडील बुटांच्या जोड्यांमध्ये रोज नवी भर पडत असली, तरी प्रीता आणि पालकी हे राजवीरची मदत करू शकतील? करण आणि प्रीता हे पुन्हा एकत्र येतील का?

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…