Home मनोरंजन लोकप्रिय अभिनेत्री ईशिता गांगुली दिसणार  ‘इच्छाधारी नागिणी’च्या भूमिकेत

लोकप्रिय अभिनेत्री ईशिता गांगुली दिसणार  ‘इच्छाधारी नागिणी’च्या भूमिकेत

7 second read
0
0
31

no images were found

लोकप्रिय अभिनेत्री ईशिता गांगुली दिसणार  ‘इच्छाधारी नागिणी’च्या भूमिकेत

‘झी टीव्ही’वरील ‘मैत्री’ या लोकप्रिय मालिकेत जीवनात अनेक चढ-उतार पाहिलेल्या मैत्री (श्रेणू पारिख) आणि नंदिनी (भाविका चौधरी) या दोन मैत्रिणींच्या जीवनाची वाटचाल चित्रीत करण्यात आली आहे. गेल्या काही भागांमध्ये मैत्रीने नंदिनीचा मुलगा नंदिशला अंमली पदार्थांच्या रॅकेटपासून कसे वाचविले आणि त्यामागील खर्‍्या गुन्हेगारांना पोलिसांकडून कशी अटक करवून घेतली, ते  प्रेक्षकांनी पाहिले. तिच्या कुटुंबियांची जेलमधून सुटका केल्यानंतर मैत्रीने नंदिनीला आपल्याबरोबर ‘तिवारी सदन’मध्ये राहण्याचीही ऑफर दिली आहे.

मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांमधील उत्कंठा कायम राखली असून अलीकडेच मालिकेत ईशिता गुप्ताचा झुमकीच्या व्यक्तिरेखेद्वारे प्रवेश झाल्यामुळे कथानकाला नवी कलाटणी मिळाली आहे. झुमकी ही प्रयागराजजवळच्या एका छोट्या खेड्यातील असते. तिला कामाची गरज असल्यामुळे मैत्री तिला तिवारी सदनमध्ये घरकामाला ठेवते. सर्वांना ती आणि तिचे काम आवडत असते, पण ती या घरात एक छुपा हेतू मनात धरून आलेली आहे, याची कोणालाच कल्पना नसते. आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना दिसेल की ती वास्तविक एक इच्छाधारी नागीण असते आणि मैत्री व हर्ष यांना हानी पोहोचवण्याचा तिचा हेतू असतो.

ईशिता गांगुली म्हणाली, “पडद्यावर इच्छाधारी नागिणीची भूमिका साकारण्यासाठी मी खूप उत्सुक बनले आहे. माझ्या कारकीर्दीत मी बर्‍्याच भूमिका साकारल्या असल्या, तरी एक अभिनेत्री म्हणून मला नेहमी स्वत:ला आव्हान द्यायला आवडतं. म्हणूनच मी झुमकीच्या भूमिकेला होकार दिला. कारण तिची व्यक्तिरेखा अगदी वेगळी आहे आणि ही भूमिकाही ‘जरा हटके’ आहे. माझ्या उत्साहाचं आणखी एक कारण म्हणजे, मला माझ्या एका अगदी जवळच्या मैत्रिणीबरोबर तब्बल वर्षभरानंतर पुन्हा एकदा एकत्र काम करायला मिळत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…