no images were found
कलाकारांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त शालेय ध्वजारोहण समारोहाला दिला उजाळा
दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी भारतात अधिक अभिमानाने व उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रयत्नांचा आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रध्वज फडकावत आणि राष्ट्रगीत म्हणत हा दिवस साजरा केला जातो. यंदा स्वातंत्र्य दिनानिमित्त टेलिव्हिजन कलाकार त्यांच्या शाळेतील भारतीय तिरंगा फडकवण्याच्या समारोहाच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. हे कलाकार आहेत गीतांजली मिश्रा (मालिका ‘हप्पू की उलटन पलटन‘मधील राजेश), नेहा जोशी (मालिका ‘दूसरी माँ‘मधील यशोदा) आणि शुभांगी अत्रे (मालिका ‘भाबीजी घर पर है‘मधील अंगूरी भाबी).
मालिका ‘हप्पू की उलटन पलटन‘मधील गीतांजली मिश्रा ऊर्फ नवीन राजेश म्हणाल्या, ”मी मुंबईत माझे शिक्षण पूर्ण केले आणि शालेय दिवसांमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करताना खूप आनंद व्हायचा. दरवर्षी माझ्या वर्गमैत्रिणींसह मी सफेद सलवार कमीज परिधान करून त्यावर तिरंगाचा दुपट्टा परिधान करायचे आणि आम्ही मंचावर देशभक्तीपर गाणी सादर करायचो. मी डान्स परफॉर्मन्समध्ये उत्साहाने भाग घ्यायचे आणि विविध भारतीय नृत्य प्रकार सादर करायचे. माझ्या शालेय दिवसांमधील या गोड आठवणी माझ्या मनाच्या खूप जवळ आहेत आणि मी अशा कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्याची संधी कधीच चुकवली नाही. या दिवसाचे खास आकर्षण संस्मरणीय ध्वजारोहण समारोह होता. आपला भारतीय ध्वज आकाशात आकर्षकपणे फडकताना पाहताना मला खूप आनंद व्हायचा. समारोहानंतर माझ्या मैत्रिणी आणि मी आमच्या मुख्याध्यापकांकडून दिले जाणारे मोतीचूरचे लाडू व स्नॅक्सचा मनसोक्त आस्वाद घ्यायचो. मला त्या दिवसांची खूप आठवण येत असली तरी आता मला माझ्या समुदायामध्ये दर स्वातंत्र्य दिनाला ध्वजारोहण करण्याचा सन्मान मिळतो, ज्यामधून मला खूप आनंद मिळण्यासोबत अभिमान वाटतो.”