no images were found
शाहुवाडी तालुक्यातील शिवसेना पदाधिका-यांचा मा. नाम चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत भाजपा पक्ष प्रवेश
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयामध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नाम. चंद्रकांत दादा पाटीलसो, ग्रामीण (पूर्व) जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर व शाहुवाडी विधानसभा प्रमुख राजू प्रभावळकर यांचे उपस्थितीमध्ये शाहुवाडी तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील माजी तालुका पदाधिकारी श्री. पांडुरंग हरिबा वग्रे उर्फ आबा व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे शाहुवाडी विधानसभा मध्ये भारतीय जनता पक्षाला बळ मिळाले आहे.
याप्रसंगी मा. नाम चंद्रकांत दादा पाटील यांनी आगामी होऊ घालणाऱ्या सर्व निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी तसेच पक्ष बळकट करण्यासाठी, केंद्र सरकार व राज्य सरकारच्या सर्व योजना तळागाळा पर्यंत पोहोचवण्यासाठी शुभेच्छा दिल्या. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक काम करत बूथ स्तरापर्यंत पक्षाचे काम होण्यासाठी सर्वांनी एक दिलाने कार्यरत राहण्याच्या सूचना केल्या.
याप्रसंगी इम्ताज शिकलगार, लियाकत नालबंद, दादासो वर्गे, शुभम तेली, श्रुकेश गवळी, प्रणव मांडवकर व इतर कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश झाला. यावेळी शाहुवाडी तालुका अध्यक्ष विजय रेडेकर,
भरमु आण्णा पाटील, संग्रामसिंह कुपेकर, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष सुनील वाणी, सरचिटणीस संजय खोत, कामगार आघाडी प्रदेश उपाध्यक्ष सचिन पाटील ई. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.