
no images were found
न्यू कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे यश
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या डी. फार्मसी परीक्षेत श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचालित न्यू कॉलेज ऑफ फार्मसी उंचगावच्या विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या पहिल्याच वर्षी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. यामध्ये प्रथम वर्ष डी फार्मसीच्या सोनल कावरे यांनी ८५.४० टक्के संपादन करून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. याचबरोबर दर्शन अलगडे – ७९.३० टक्के, अपूर्वा शेटके – ७८.८० टक्के, प्राची निगडे – ७८.५० टक्के, प्रज्ञा खाबडे – ७८.०० टक्के, नितीन छाबडिया – ७८.०० टक्के मिळवून यांनी अनुक्रमे यश संपादन केले.
प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांकडून बोर्ड परीक्षेच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करून घेत अवघड विषयांची उजळणी करून तसेच विध्यार्थाना वेगवेगळ्या नोट्स व अभ्यासाचे साहित्य उपलब्ध करून करून दिले. विध्यार्थांनी थेट शिक्षकांशी संपर्क साधून शंकांचे निरसन करून घेतले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा श्री. बी.जी. बोराडे, चेअरमन मा.श्री. के.जी. पाटील, व्हा.चेअरमन मा.श्री. डी.जी किल्लेदार, खजाणीस मा.श्री. वाय.एस.चव्हाण. व सर्व संचालकांनी विशेष अभिनंदन केले.या प्रसंगी आयोजित केलेल्या कौतुक समारंभास चेअरमन मा.श्री. के.जी. पाटील, संचालक मा.श्री. वैभवकाका नायकवडी, विकासधिकारी डॉ. संजय दाभोळे व कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र कुंभार उपस्थित होते. सर्व विधयार्थाना प्रा.डॉ. सचिन पिशवीकर, प्रा.पियुषा नेजदार, प्रा.अंकिता शिंदे,प्रा. सुजित साळोखे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.