Home मनोरंजन ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची निर्मिती पुरुषांसाठी केली होती – केदार शिंदे..

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची निर्मिती पुरुषांसाठी केली होती – केदार शिंदे..

3 second read
0
0
59

no images were found

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची निर्मिती पुरुषांसाठी केली होती – केदार शिंदे..

कोल्हापूर – बाईपण भारी देवा या चित्रपटाची निर्मिती पुरूषांसाठी केली आहे कारण महिलांच्या भावविश्वाची, मानसिक घालमेल पुरूषांना कळाली तर अनेक महिलांच्या जीवनात सुख,आनंद भरभरून जाईल.आजवर अनेक सिनेमे निर्मिती व दिग्दर्शित केले पण विनोदाच्या चौकटीबाहेर जाऊन महिलांच्या विश्वाची वेगळी कथा मांडणाऱ्या बाईपण देवा या चित्रपटाने मलाही वेगळी ओळख करून दिली,या चित्रपटाचे यश आनंददायी आहे,अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक केदार शिंदे यांनी व्यक्त केली.ते बाईपण भारी देवा चित्रपटाविषयी कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास 24 दिवस झाले आहेत तरीदेखील प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयीचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसत नाही. आणि ह्याच अपेक्षेवर खरं उतरत ह्या चित्रपटाने केवळ 24 दिवसांत केलेली 65.61 कोटींची कमाई केली आहे. आणि हे चित्र पाहता हया चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीला आलेली मरगळ झटकून फेकून दिलीय अशी चर्चा रंगलेली दिसत आहे. आता या टीमने  कोल्हापूर दौरा केला असून महालक्ष्मी मंदिर,महिला बचत गट,सिनेमागृह प्रेक्षक व पत्रकारांना भेटून या उज्ज्वल यशाबद्दल धन्यवाद दिले आहेत. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे,सुकन्या मोने,शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर  व जियो स्टेडिओचे निखिल साने आवर्जून उपस्थित होते
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटानं पहिल्या आठवड्यात 12.50 कोटींचा गल्ला जमवला होता, दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटानं बॉक्सऑफिसवर आपली हुकमत कायम ठेवत 24.85 कोटींची  कमाई केली, त्याच प्रमाणे तिसऱ्या तिसऱ्या आठवड्यात ही बाजी मारत 21.24 कोटींची कमाई केली आहे. आणि आतापर्यंत फक्त 24 दिवसांत ह्या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर एकूण 65.61 कोटींचा पल्ला गाठला आहे.  प्रदर्शनानंतर ‘बाईपण भारी देवा’नं नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवले आहेत आणि सिनेमागृहात ओसांडून वाहणारी प्रेक्षकांची गर्दी बघता ही आकडेवारी अजून मोठी झेप घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
”आपल्या चित्रपटाच्या यशाचं सगळं क्रेडिट त्यातील अभिनेत्री आणि त्यासाठी सर्वतोपरे मेहनत घेणाऱ्या माझ्या टीमचं आहे”, अशी भावना दिग्दर्शक केदार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. चित्रपटाची लेखिका वैशाली नायक हिचे विशेष आभार मानत केदार शिंदे यांनी तिच्या लिखाणाचं कौतूकही केलं.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची निर्मिती माधुरी भोसले आणि स्वतः जिओ स्टुडिओनं केली आहे. या चित्रपटाचे सह-निर्माते बेला शिंदे आणि अजित भुरे हे आहेत. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशी अभिनेत्रींची तगडी स्टारकास्ट आहे. आणि आजही चित्रपटाचे कलाकार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी थिएटर्समध्ये जाऊन प्रेक्षकांची भेट घेताना दिसत आहेत.त्या अंतर्गत कोल्हापूर दौरा आयोजित करण्यात आला होता.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प

  ‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प   कोल्हापू…