no images were found
निधीवाटपा बाबत भारत गोगावले यांनी माध्यमांशी साधला संवाद
विधानभवनात भरत गोगावले माध्यमांशी संवाद साधला म्हणाले निधीवाटपात कोणावरही अन्याय होऊ दिला नाही.सगळ्यांना व्यवस्थित निधी दिला आहे. कोणाचीही तक्रार नाही. कोणाला तक्रार असेल तर आम्हाला सांगा.
ज्यांनी आपल्या मतदारसंघातील कामे सुचवली होती, त्यांना तसा निधी मिळाला आहे. जी कामं सुचवली त्या अनुषंगाने निधी मिळाला.एखादा अपवाद असेल तर सुधारणा करता येईल. कोणावर अन्याय होणार नाही, याची दक्षता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतली आहे. आमदार समाधानी आहेत, काळजी करण्याचं कारण नाही.”
अजित पवारांनी अर्थमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काही आमदारांना सढळहस्ते निधीवाटप केले आहे. तर काही आमदारांवर अन्याय झाला असल्याचा आरोप केला जात आहे.
यावरून राज्यात चर्चा सुरू आहे. निधीवाटपात अपहार झाला असल्याचा आरोप विरोधी गटाकडून केला जात आहे.दरम्यान, यावरून भरत गोगावले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. निधीवाटपात कोणावरही अन्याय होऊ दिला नाही, असंही ते म्हणाले.