Home मनोरंजन तिलोत्तमा शोमने सांगितला बॉलीवूडचा झकास अभिनेता अनिल कपूरसोबत काम करण्याचा अनुभव 

तिलोत्तमा शोमने सांगितला बॉलीवूडचा झकास अभिनेता अनिल कपूरसोबत काम करण्याचा अनुभव 

7 second read
0
0
110

no images were found

तिलोत्तमा शोमने सांगितला बॉलीवूडचा झकास अभिनेता अनिल कपूरसोबत काम करण्याचा अनुभव 

 

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील द कपिल शर्मा शो मध्ये या वीकएंडला या सीझनचा फिनाले प्रसारित होणार आहे. हा फिनाले संस्मरणीय करण्यासाठी नाइट मॅनेजर सीझन 2 चे कलाकार अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर, शोभिता धुलिपाला, तिलोत्तमा शोम, रवी बहल या भागात उपस्थित असणार आहेत. कपिल शर्मा आणि त्याचा अतरंगी मोहल्ला प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे एक अविस्मरणीय अनुभव. हास्यविनोद आणि मनोरंजनाने भरलेला हा फिनाले असेल!

 

मजेदार गप्पांच्या ओघात तिलोत्तमा बॉलीवूड आकर्षक अभिनेता अनिल कपूर याच्यासोबत काम करण्याचा आपला अनुभव सांगेल. ती म्हणते, “मी एकदा अनिल कपूरचा सीन बघायला आणि पहिल्यांदाच त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा असेल ही अजमावायला सेटवर गेले होते. तिथले वातावरण कसे असते, याचा अंदाज मला घ्यायचा होता. मी सीनचे निरीक्षण करत असल्याचे त्याने पाहिले आणि त्याने मला त्या दृश्याबद्दल माझी प्रतिक्रिया विचारली. इतक्या अनुभवी अभिनेत्याला मी काय सांगणार? मी त्याला म्हटले की सीन छान होता. त्याने पुन्हा एकदा मला माझे विचार सांगण्याची गळ घातली. त्यामुळे मग मी तिथून निसटले आणि माझ्या खोलीत गेले. मी खाली उतरत असताना त्याने पुन्हा एकदा त्या दृश्याविषयी माझे विचार सांगण्याची विनंती केली आणि मला समजले की मला काही तरी सांगणे भागच आहे. मी गोरीमोरी झाले. कित्येक दशके आपले मनोरंजन करत असलेल्या अभिनेत्याला आपण काय फीडबॅक देणार? त्याचे आकर्षक व्यक्तिमत्व आणि त्याचे काम मला पहिल्यापासून खूप आवडते.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…