no images were found
लहान पडद्यावरील खास जिवलग मैत्री
भारतीय टेलिव्हिजनवरील विविध मालिकांमधून आपल्याला काही खास जिवलग मैत्रींचा अनुभव मिळाला आहे. त्यांच्या नात्यांमधून प्रेम, काळजी, दयाळूपणा व एकतेची भावना पाहायला मिळाली आहे. लहान पडद्यावरील या मैत्रीने प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकालीन छाप निर्माण केली आहे. यंदा इंटरनॅशनल फ्रेण्डशीप डे निमित्त एण्ड टीव्हीवरील मालिकांमधील पात्रं पडद्यावरील अतूट मैत्रीच्या नात्याबाबत सांगत आहेत. हे कलाकार आहेत मालिका ‘दूसरी माँ’मधील अशोक (मोहित डागा) व मनोज (आरजे मोहित), मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील दरोगा हप्पू सिंग (योगेश त्रिपाठी) व बेनी (विश्वनाथ चॅटर्जी) आणि मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील टिका (वैभव माथूर) व टिलू (सलिम झैदी). मालिका ‘दूसरी माँ’मधील मोहित डागा ऊर्फ अशोक म्हणाले, ”कुटुंबापर्यंत पोहोचणे अवघड असताना नेहमी पाठिंबा देण्यासाठी मित्र असतात आणि मनोज अशोकसाठी तसा मित्र आहे. अशोकचे जीवन संकटात असताना मनोजने जिवलग मित्राप्रमाणे त्याला पाठिंबा दिला आणि भावासारखा त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला. आजही अशोक त्याच्या कुटुंबासोबत नसताना मनोज यशोदाला सर्वतोपरी मदत करत आहे. अशोक मनोजवर पूर्णत: विश्वास ठेवू शकतो. काहीही संकोच न करता अशोक मनोजला सिक्रेट्स सांगतो. व्यक्ती, स्थिती व समस्यांना जाणून घेण्याच्या मनोजच्या क्षमतेची अशोकला नेहमी योग्य निर्णय घेण्यामध्ये मदत होते.”
मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील योगेश त्रिपाठी ऊर्फ दरोगा हप्पू सिंग म्हणाले, ”बेनी हप्पूचा ‘जिवलग मित्र’ आहे. हप्पू त्याच्या कृतींमुळे अनेकदा संकटात सापडतो, पण बेनी नेहमी त्याच्या मदतीस धावून येतो. तो नेहमी हप्पूला अनपेक्षित सल्ला देतो, ज्यामुळे तो अधिक संकटात सापडतो. तरीदेखील हप्पू मदतीसाठी त्याच्याकडेच जातो. हप्पू व बेनी जिवलग मित्र आहेत आणि एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाहीत. त्यांचे कुटुंबिय एकमेकांसोबत कितीही भांडत असले तरी ते एकत्र येऊन मद्यापानाचा आनंद घेतात, तसेच असलेले दु:ख दूर करण्याचा प्रयत्न करतात. बेनी खरा मित्र आहे आणि हप्पूच्या जीवनात आनंदाची भर करतो.” मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील वैभव माथूर ऊर्फ टिका म्हणाले, ”टिका व टिलू हे मैत्रीचे प्रतीक आहेत. त्यांचे सर्व प्रँक्स व खोडकरपणा एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. ते एकत्र असताना खूप धमाल करतात. टिका व टिलूची डायनॅमिक व कणखर मैत्री धमाल, मनोरंजनपूर्ण व विनोदी आहे. त्यांची पडद्यावरील ‘यारी’ एकमेकांना परिपूर्ण करते आणि प्रेक्षकांना त्यांची जोडी पाहताना धमाल वाटते. टिका व टिलू एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत आणि स्थिती काहीही असो नेहमी एकमेकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहतात. त्यांच्यामधील धमाल आणि मालिकेमध्ये ते एकमेकांना देणारा पाठिंबा त्यांना भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वोत्तम जोडी बनवतात.”