Home शासकीय रांगणा किल्ला, नाईकवाडी, सवतकडा, तोरस्करवाडी धबधबे पर्यटनासाठी बंद

रांगणा किल्ला, नाईकवाडी, सवतकडा, तोरस्करवाडी धबधबे पर्यटनासाठी बंद

12 second read
0
0
23

no images were found

रांगणा किल्ला, नाईकवाडी, सवतकडा, तोरस्करवाडी धबधबे पर्यटनासाठी बंद

             

       कोल्हापूर : जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात माहे जुलै ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत होणाऱ्या पावसामुळे रांगणा किल्ला, शिवडाव बुद्रुक येथील नाईकवाडी धबधबा व दोनवडे येथील सवतकडा धबधबा तसेच भुदरगड तालुक्यालगत असणाऱ्या तोरस्करवाडी धबधब्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांना व स्थानिकांना बंदी करण्यात आली असल्याची माहिती भुदरगड तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा तहसिलदार अश्विनी वरुटे-अडसूळ यांनी दिली आहे.

भुदरगड तालुक्यातील मौजे चिक्केवाडी गावातील माथ्यावर असणाऱ्या रांगणा किल्ल्यावर पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. रांगणा किल्ल्याच्या परिसरात पावसाळयामध्ये २४ तासात सरासरी १०० किंवा त्यापेक्षा जास्त पर्जन्यमान होते. किल्ल्यावर जाण्यासाठी अत्यंत बिकट वाट आहे. किल्ल्यावर जाताना वाटेवर ५ ते ६ ओढे नाले आहेत. तसेच किल्ल्याच्या परिसरात नेटवर्क नसल्यामुळे मोबाईलव्दारे किंवा कोणत्याही प्रकारे संपर्क करता येत नाही. दिनांक १८ जुलै २०२३ रोजी किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेले १७ पर्यटक अडकले होते. त्यांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. या घटनेची पुननावृत्ती होऊ नये किंवा एखादी दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पावसाळा संपेपर्यंत रांगणा किल्ल्याकडे तसेच शिवडाव बुद्रुक येथील नायकवाडी धबधबा व दोनवडे येथील सवतकडा धबधबा व नितवडे येथील तोरस्करवाडी धबधबा इत्यादी ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांकडे पर्यटनासाठी जाऊ नये, असे आवाहन श्रीमती अडसूळ यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…