Home क्राईम सांगली, मीरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील वीज देयक गैरव्यवहाराची एसआयटीमार्फत चौकशी – मंत्री उदय सामंत

सांगली, मीरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील वीज देयक गैरव्यवहाराची एसआयटीमार्फत चौकशी – मंत्री उदय सामंत

35 second read
0
0
21

no images were found

सांगलीमीरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील वीज देयक गैरव्यवहाराची एसआयटीमार्फत चौकशी – मंत्री उदय सामंत

            मुंबई  : सांगलीमीरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील वीज देयक भरणा गैरव्यवहार आणि अनियमितता प्रकरणी 15 दिवसांत एसआयटी (विशेष चौकशी समिती) गठित करून चौकशी करण्यात येईल. या चौकशीअंती दोषींवर कारवाई केली जाईलअसे मंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

             विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

            मंत्री श्री. सामंत म्हणाले की, या अनियमिततेप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वीज देयके तयार करणाऱ्या महानगरपालिकेच्या तीन विभागातील जबाबदार एकूण ११ कर्मचाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तसेच २०१० पासून त्रयस्थ पद्धतीने याप्रकरणी सांगली महानगरपालिकेचे लेखा परीक्षण केले जाणार आहे.

            कोविड काळात तपासणी न करता वीज देयके देण्यात आली आहेत. या देयकांबाबत ही तपासणी करावीअशी सूचना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चर्चेदरम्यान केली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…