Home सामाजिक सनातन प्रवाहाच्या आड येणाऱ्यांना सहनही करणार नाही ! – गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय संस्कृतिक मंत्री

सनातन प्रवाहाच्या आड येणाऱ्यांना सहनही करणार नाही ! – गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय संस्कृतिक मंत्री

16 second read
0
0
35

no images were found

सनातन प्रवाहाच्या आड येणाऱ्यांना सहनही करणार नाही ! – गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय संस्कृतिक मंत्री

नवी दिल्ली – दिल्ली येथील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव हा केवळ उत्सव नव्हे, तर भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागृतीचा उदघोष करणार हा एक उत्सव आहे. अयोध्येत प्रभुश्रीरामाची पुनर्स्थापनेनंतर कालचक्र पालटल्याचे आणि भारतीय संस्कृतीचा पुन:श्च उदय होऊ लागल्याचे दिसू लागले आहे. देश आज सांस्कृतिक पालटाची स्थिती अनुभवत आहे. सनातन धर्म हा कुणाच्याही विरोधात नाही; मात्र सनातन प्रवाहाच्या आड येणाऱ्यांना सहन केले जाणार नाही, *असे ठाम प्रतिपादन केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री श्री. गजेंद्रसिंह शेखावत* यांनी केले. ते नवी दिल्ली येथील भारत मंडपम् येथील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त बोलत होते. मा. शेखावतजी पुढे म्हणाले की, सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी गेली २५ वर्षे संस्थेच्या कार्यातून केवळ साधकांची आध्यात्मिक उन्नती केलेली नाही, तर समाजाला नैतिकता, राष्ट्रबोध, तसेच सर्वांत महत्त्वाचे म्हणजे समाजात धर्मचेतना निर्माण केली आहे.

    काशी-मथुराच नव्हे, तर देशातील प्रत्येक मंदिर मुक्त होईपर्यंत लढ्याचा निर्धार करा ! – अधिवक्ता विष्णु जैन

     अनेक राज्यांमध्ये सरकार केवळ हिंदूंची मंदिरेच का ताब्यात घेते ? सरकारला मशिदी, चर्चेस यांतील गैरव्यवस्थापन दिसत नाही का ? शासन मंदिर मुक्तीचा कायदा कधी आणणार?, तसेच आपण सर्वच हिंदूविरोधी कायदे संपवण्याची मागणी लावून धरली पाहिजे ! केवळ काशी विश्व नाथ आणि श्रीकृष्ण जन्मभूमीच नाही, तर देशातील अतिक्रमण केलेले प्रत्येक हिंदू मंदिर मुक्त होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार आपण केला पाहिजे,  असे आवाहन सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी  केले.

 शंखनाद महोत्सवामुळे धर्म-अधर्माच्या युद्धात धर्माचाच विजय निश्चित ! – आलोक कुमार, विहिंप

     शंखनाद हा धर्म-अधर्म युद्धाच्या वेळी केला जातो. भारताच्या राजधानीत होत असलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’मुळे धर्म-अधर्माच्या युद्धात धर्माचाच विजय निश्चित होईल, याची खात्री वाटते. दिल्ली येथे हल्लीच आतंकवादी आक्रमण झाले. हे आतंकवादी उच्चशिक्षित होते आणि यामुळे जिहाद हा गरीबी, अशिक्षितपणा, मुलभूत गरजा नसणे आदींमुळे वैफल्यग्रस्त होऊन केला जातो, हा भ्रम नष्ट झाला आहे. अल्पसंख्याकांना दिलेल्या विशेषाधाकारांचा पुनर्विचार झाला पाहिजे, असे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार म्हणाले.

‘जनसंख्या जिहाद’ रोखणे अत्यावश्यक ! – डॉ. सुरेश चव्हाणके, सुदर्शन न्यूज नेटवर्क

     ‘हिंदू शस्त्राच्या लढाईत सक्षम आहे; मात्र तो वैचारिक लढ्यामध्ये कमी पडतो. हिंदूंना ‘हम दो, हमारे दो’ असा शिकवण दिली गेली आणि आज हिंदूंचा देहली येथे जन्मदार १.१, मुंबई येथील जन्मदर १.३ अशी दयनीय स्थिती झाली आहे. अनेक देश हे जन्मदर वाढवल्याने इस्लामी देश झाले, तर काही देश घुसखोरीमुळे इस्लामी झाले आहेत. घुसखोरांना देशातून हाकलून लावण्यासाठी देशात ‘एन्.आर्.सी.’ लागू केली पाहिजे, असे प्रतिपादन *सुदर्शन न्यूजचे संपादक डॉ. सुरेश चव्हाणके* यांनी केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…