Home शासकीय विकासकामांमुळे बाधित नागरिकांच्या त्याच जागेत पुनर्वसनाबाबत समिती स्थापन करणार – मंत्री उदय सामंत

विकासकामांमुळे बाधित नागरिकांच्या त्याच जागेत पुनर्वसनाबाबत समिती स्थापन करणार – मंत्री उदय सामंत

46 second read
0
0
18

no images were found

विकासकामांमुळे बाधित नागरिकांच्या त्याच जागेत पुनर्वसनाबाबत समिती स्थापन करणार – मंत्री उदय सामंत

            मुबई  : राज्य शासनाच्यावतीने मुंबईमध्ये विविध विकासकामे सुरू आहेत. विकासकामांमुळे स्थानिक नागरिक बाधित होतात. पुनर्वसनाशिवाय पुनर्विकास नाही हे शासनाचे धोरण आहे. तथापिबाधित होणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी करण्याबाबत समिती स्थापन करण्यात येईलअशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

            वरळी येथील रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होणाऱ्या अनिवासी गाळेधारकांच्या पुनर्वसनासंदर्भात  सदस्य सुनील शिंदे यांनी प्रश्न विचारला होता.

            मंत्री श्री.सामंत म्हणाले कीबाधितांचे त्याच जागेवर पुनर्वसन करण्याबाबत नेमण्यात येणाऱ्या समितीमार्फत तेथे जागा उपलब्ध आहे किंवा नाहीअसल्यास उपलब्ध जागेनुसार योग्य पुनर्वसन होऊ शकेल का, याबाबत अभ्यास केला जाईल. या समितीमध्ये स्थानिक आमदारांचा समावेश करावाया मागणीविषयी माहिती देताना प्रत्येक पक्षनिहाय एक आमदाराचा यामध्ये समावेश करण्यात येईलअसे मंत्री श्री.सामंत यांनी सांगितले.

            मंत्री श्री. सामंत म्हणाले कीवरळी भागातील डॉ. ई मोजेस मार्गगणपतराव कदम मार्ग व केशवराव खाडे मार्गावर रस्ता रूंदीकरण होत आहे. या रस्त्याचे रूंदीकरण करणे गरजेचे असून कमीत कमी लोक बाधित होतील असा प्रयत्न केला जाईल. त्याचप्रमाणे त्यांचे पूनर्वसन झाल्यानंतरच पुनर्विकासाचे काम केले जाईलअसेही त्यांनी स्पष्ट केले. या अनुषंगाने पात्रता/ अपात्रता निश्चित करण्याकरिता गाळेधारकांमार्फत सादर करण्यात आलेल्या पुराव्यांची महानगरपालिकेमार्फत पडताळणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्याचे रूंदीकरण करताना 100 फुटांच्या रस्त्याची आवश्यकता आहे काकिंवा तो कमी करता येईल काते तपासून पाहिले जाईलअसेही त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

            या अनुषंगाने झालेल्या चर्चेदरम्यान सदस्य सर्वश्री सचिन अहीरप्रवीण दरेकर यांनी उपप्रश्न विचारले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…