no images were found
माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही :- किरीट सोमय्या यांनी देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं
मुंबई :- माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी, अशी माझी आपणास विनंती आहे.असं किरीट सोमय्या यांनी देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
ही व्हिडीओ क्लिप किंवा अन्य अशा व्हिडीओ क्लिप (जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास) या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशीही करावी, अशी मी आपणास विनंती करीत आहे.”, असं किरीट सोमय्या यांनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडीओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली आहे. या निमित्तानं अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले असून आक्षेपही घेतले आहेत. अशाप्रकारच्या अनेक व्हिडीओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असंही सांगण्यात आलं आहे. मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडीओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत.
माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही, असं म्हणत किरीट सोमस्यांनी त्यांच्यावर होत असलेले, सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच, यासर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्यांनी फडणवीसांकडे केली आहे.गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हणालेत किरीट सोमय्या?