Home क्राईम  राष्ट्रपुरुष, देवतांची विटंबना करणार्‍या अकाऊंटच्या विरोधात तक्रार 

 राष्ट्रपुरुष, देवतांची विटंबना करणार्‍या अकाऊंटच्या विरोधात तक्रार 

8 second read
0
0
105

no images were found

 राष्ट्रपुरुष, देवतांची विटंबना करणार्‍या अकाऊंटच्या विरोधात तक्रार 

कोल्हापूर – ‘इंस्टाग्राम’ या सामाजिक प्रसार माध्यमाद्वारे ‘ambedkar_the_baap_of_manuwadi’ या अकाऊंटवर छत्रपती शिवाजी महाराज, विविध महापुरुष, देवी-देवता, राजकीय नेते यांची विटंबनात्मक छायाचित्रे प्रसारित केली जात आहेत. सदर छायाचित्रे समाजामध्ये तेढ निर्माण करणारे असून सामाजिक शांतता भंग करणारे आहेत. अंत्यंत अश्‍लील आणि गलिच्छ प्रकारे संरचना (एडीटींग) करून महापुरुष आणि देवता यांचे चेहरे जोडलेले आहेत. त्यामुळे संबंधित अकाऊंट तात्काळ बंद करून आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीची तक्रार कोल्हापूर येथे लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाप्रमुख श्री. दीपक देसाई यांनी तक्रार दिली असून यावर पोलिसांनी २९५ अ आणि ५०५ या कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे.
या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते. 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…