no images were found
खलिस्तानी समर्थकांकडून भारतीय विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला
ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तानी समर्थकांकडून भारतीयांना लक्ष्य केलं जात आहे. परदेशी भूमीवर खलिस्तान समर्थकांची आंदोलनं सुरुच आहेत. कॅनडा लंडन नंतर आता ऑस्ट्रेलिया मध्येही खलिस्तानी समर्थक पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसत आहे.
शुक्रवारी ऑस्ट्रेलियामध्ये एका 23 वर्षीय भारतीय विद्यार्थ्यावर खलिस्तानी समर्थकांनी लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यांनी भारतीय विद्यार्थ्याला रस्त्यावर लोखंडी सळीनं बेदम मारहाण केली. हल्ल्यात एक भारतीय विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. खलिस्तानी आंदोलनांविरोधात आवाज उठवल्यानंतर त्यांनी एका भारतीय विद्यार्थ्याला लक्ष्य केलं.
पीडित विद्यार्थ्याने सांगितलं की, ”मी पहाटे 5.30 वाजता कामावर जाण्यासाठी निघालो असताना, 4-5 खलिस्तानी समर्थकांनी हल्ला केला. मी विद्यार्थी असून ड्रायव्हर म्हणूनही काम करतो. मी राहतो त्या ठिकाणापासून माझी गाडी 50 मीटर अंतरावर होती. मी गाडीत बसल्यावर अचानक खलिस्तानींनी हल्ला केला. एकाने गाडीचा उजवा दरवाजा उघडला, दुसऱ्या व्यक्तीने मला उजव्या डोळ्याच्या खाली लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यानंतर ड्रायव्हरच्या बाजूचा दरवाजा उघडून मला खाली ओढलं आणि लोखंडी सळीने बेदम मारहाण केली.”