Home शैक्षणिक डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या ८५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या ८५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

0 second read
0
0
24

no images were found

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या ८५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

तळसंदे:/वार्ताहर : तळसंदे येथील डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८५ विध्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये नामांकित राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय कंपन्यामध्ये नोकरीची संधी मिळाली आहे. महाविद्यालयाची विद्यार्थीनी सेजल प्रमोद पाटील हिची टीसीएसकडून ७ लाखांच्या पॅकेजवर निवड झाली आहे. तर सलोनी बजरंग कांबळे हिला हेक्सावेअर या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये ६ लाख, प्रथमेश रमेश सुतार याला एजिल्याड्ड टेक्नॉलाजीमध्ये ५ लाख, अंकेष जयहिंद पटेल याला ईवायजीडीएस मध्ये ५ लाख व मोहमद साद काझी याला उनोमिंडामध्ये ४.८ लाखाच्या पॅकेजची ऑफर मिळाली असल्यची माहिती कॅम्पस डायरेक्टर डॉ सतीश पावसकर यांनी दिली.

डॉ. पावसकर म्हणाले, शैक्षणिक वर्षाच्या परीक्षेचे निकाल बाकी असून त्याआधीच विद्यार्थ्यांना नोकरीसाठी नियुक्ती पत्र मिळाली आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी यसाठी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह घेतले जात आहेत. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा शोएब तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना बुद्धिमत्ता चाचणी, कॅम्युनिकेशन स्किल, प्रत्येक विभागासाठी टेक्निकल ट्रेनिंग, ग्रुप डिस्कशनची संधी दिली जाते. त्याचा चांगला फायदा प्लेसमेंटसाठी झाला आहे. या व्यतिरिक्त विध्यार्थ्यांना उद्योजकतेविषयी प्रेरणा मिळण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन दिले जात असून स्पर्धा परीक्षासाठी विशेष मार्गदर्शन दिले जाते.

डी वाय पाटील ग्रुप चे कार्यकारी संचालक डॉ अनिलकुमार गुप्ता म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रुपच्या सर्वच महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षापासूनच भर दिला जातो. अभ्यासक्रमाबरोबरच विविध उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाते. त्यामुळे प्लेसमेंट मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. यावर्षी ट्रेनी इंजीनिअर, सॉफ्टवेअर इंजीनिअर, प्रोग्रॅम इंजीनिअर, इलेक्ट्रिकल इंजीनिअर, मेकॅनिकल इंजीनिअर, सर्व्हेअर इत्यादी पदावर त्या त्या विभागातील अग्रगण्य कंपनीमध्ये विध्यार्थी निवड झाली आहे. अनेक विध्यार्थी स्टार्ट अप इंडिया अंतर्गत नव उद्योजक झाले आहेत.

या निवडीमध्ये प्लेसमेंट अधिकारी प्रा सुदर्शन सुतार, कॉम्पुटर सायन्स विभाग प्रमुख प्रा. उमेश पाटील, इलेक्ट्रिकल विभागप्रमुख प्रा. मोहसीन बिजली, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशन विभागप्रमुख प्रा मंदार खटावकर, मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. एम. एस. फरास, सिव्हिल इंजिनीरिंग विभाग प्रमुख प्रा. केदार एस रेडेकर, एमबीए विभाग प्रमुख प्रा गुणाली उगले, प्लेसमेंट अधिकारी प्रा. शोएब तांबोळी, रजिस्ट्रार पी. एम. भागाजे, अकॅडेमिक डीन प्रा.आर. एस. पवार, सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.

या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, कॅम्पस डायरेक्टर डॉ. सतीश पावसकर यांनी अभिनंदन केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अमल महाडिक यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवर,  कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

अमल महाडिक यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवर,  कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यां…