
no images were found
मुख्यमंत्री ना.शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत काम करण्यास अनेकजन इच्छुक; लवकरच पक्षप्रवेश घेवू : श्री.राजेश क्षीरसागर
शिवसेनेत घडलेल्या क्रांतीच्या वर्षपूर्ती नंतरही शिवसेनाप्रमुखांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत शिवसेना नेत्यांसह शिवसैनिकांचा सामील होण्याचा ओघ वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ९० ते ९५ टक्के शिवसैनिक मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सोबत काम करत आहेत. परंतु, ज्यांच्याकडे काही धोरण, समाजकार्याची दृष्टी नाही अशांच्या सोबत काही शिवसैनिक गैरसमजुतीतून काम करत आहेत. पण, मुख्यमंत्री ना.शिंदे साहेबांचे काम आणि नेतृत्व याने प्रेरित होवून उर्वरित गटातील शिवसैनिक मुख्यमंत्री ना.शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास इच्छुक आहेत. पुढच्या काळात निश्चितच मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली भगवा महाराष्ट्र करण्यासाठी समस्त शिवसैनिक धनुष्यबाण या चिन्हाखाली एकवटतील. पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी समस्त शिवसैनिक प्रयत्नांची पराकष्ठा करतील. उर्वरित गटातील अनेक शिवसैनिक संपर्कात असून, आगामी काळात त्यांचे पक्षप्रवेश घेवू, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.