
no images were found
मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत इनकमिंग सुरुच
मुंबई : शिवसेनाप्रमुखांचे विचार, समाज कार्याचा वसा पुढे घेवून जाणारे शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात दिवसेंदिवस इनकमिंग वाढत असून, काही दिवसांपूर्वी विधान परिषद उपनेत्या डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी पक्षप्रवेश केला. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास राज्यातील प्रमुख शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक पक्ष प्रवेश करत आहेत. आज ठाकरे गटाचे एस.टी.कामगार सेनेचे सहसचिव श्री.जितेंद्र इंगवले यांनी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकाराने ही भेट झाली.
यावेळी शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर यांच्यासह एस.टी.कामगार सेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी एस.टी.कामगार सेनेचे सहसचिव श्री.जितेंद्र इंगवले यांचे स्वागत केले. यानंतर एस.टी.कामगार सेनेचे सहसचिव श्री.जितेंद्र इंगवले यांनी मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत काम करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या दि.१४ जुलै रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या सभेत श्री.जितेंद्र इंगवले आणि एस.टी.कामगार सेना (ठाकरे गट) प्रमुख पदाधिकारी यांचा जाहीर प्रवेश होणार आहे.