Home क्राईम शाळेसमोरुन अपहरण करून धावत्या गाडीत बालिकेवर लैंगिक अत्याचार

शाळेसमोरुन अपहरण करून धावत्या गाडीत बालिकेवर लैंगिक अत्याचार

0 second read
0
0
51

no images were found

शाळेसमोरुन अपहरण करून धावत्या गाडीत बालिकेवर लैंगिक अत्याचार

वर्धा :  वर्धा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेसमोरुन अपहरण करुन एका 13 वर्षीय मुलीवर धावत्या गाडीत अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. राज्यात दिवसेंदिवस अत्याचार, बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे आहे

नागपूरात फेसबुक फ्रेंडकडून अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव शहरात शाळेत जात असताना एका बालिकेचे चाकूचा धाक दाखवून दोघा नराधमांनी तिचे अपहरण करीत कारमध्ये बसवून धावत्या गाडीत लैंगिक अत्याचार केला. या घटनेने एकच खळबळ उडली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुलगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पीडिता ही दररोज प्रमाणे घरुन शाळेत जाण्यासाठी निघाली होती. मात्र, शाळेत जात असतानाच तिला सुमेध मेश्राम नामक युवक आणि एका अनोळखी युवकाने आवाज दिला. पीडिता ही शाळे समोरील प्रवेशद्वाराजवळ थांबली असता आरोपी नराधम सुमेध याने चाकूचा धाक दाखवून तिला जबरदस्ती चारचाकी वाहनात जबरदस्ती खेचत नेत बसवले. यानंतर अनोळखी युवकाने चारचाकी समोर नेली. पीडिता ही आरडाओरड करीत होती. पण, कारच्या काचा बंद होत्या. सुमेधने पीडितेवर धावत्या कारमध्येच बळजबरी अत्याचार केला. तसेच ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

पीडितेने सर्व आपबिती तिच्या घरच्यांना सांगितली असता आईने थेट पुलगाव पोलीस ठाणे गाठले. पीडितेच्या आईने सुमेध आणि एका मित्राविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा केला आहे. लवकरच दोघांनाही अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…