no images were found
केंद्रीय उर्जाराज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडून श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या कामाची पहाणी !
कोल्हापूर – केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक यांनी श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या विकास कामांची पहाणी केली. श्रीपाद नाईक यांनी श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शनही घेतले. या वेळी श्रीपाद नाईक यांनी मनकर्णिका कुंडाची पहाणी करून चालू असलेल्या कामाच्या संदर्भात काही सूचना आणि मार्गदर्शन केले. या कामाच्या संदर्भात ऊर्जा विभागाच्या वतीने काही साहाय्य लागले, तर सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या वेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सचिव सौ. वर्षा साळुंखे, धर्मशास्त्र मार्गदर्शक श्री. गणेश नेर्लेकर, मराठा तितुका मेळवावाचे कार्यप्रमुख श्री. योगेश केरकर, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, श्री. युवराज शिंदे, तसेच इतर कार्यकर्ते आणि भाविक उपस्थित होते.