
no images were found
इंडियाज गॉट टॅलेंटच्या यंदाच्या सत्रात देखील शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा परीक्षक म्हणून दिसणार
आपल्या देशातील विविध प्रकारच्या प्रतिभेचा गौरव करण्यासाठी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन पुन्हा एकदा इंडियाज गॉट टॅलेंट हा लोकप्रिय रियालिटी शो घेऊन येत आहे. देशातील या सर्वात मोठ्या प्रतिभा मंचावर याआधी असामान्य कला अंगी असणारे गायक, नर्तक, जादूगार, विनोदवीर, रॅपर, बीटबॉक्सर आणि स्टंट करणारे असे विविध कुशल आणि मनाला आनंद देणारे परफॉर्मर्स येऊन गेले आहेत. आणि आता पुन्हा एकदा देशातील प्रतिभा हुडकून काढणाऱ्या या मंचावर अशा काही निवडक सामान्य व्यक्तींवर प्रकाशझोत येणार आहे, ज्यांच्यात आपल्या प्रतिभेच्या बळावर असामान्य बनण्याची क्षमता आहे.
यंदाच्या सत्रात मनोरंजनाचा निर्देशांक आणखी वर घेऊन जाण्यासाठी बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा या शोमध्ये परीक्षणाचे काम करणार आहे. या कार्यक्रमाला तिची कलेची पारख करणारी नजर पुन्हा एकदा लाभणार आहे, ज्यामुळे असामान्य परफॉर्मन्सची पारख करून सर्वात जास्त लक्षणीय अॅक्टला स्पर्धेत आणखी पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. तर मग मंत्रमुग्ध होण्यासाठी सज्ज आहात ना?
इंडियाज गॉट टॅलेंटसाठी पुन्हा परीक्षक म्हणून पुनरागमन करत असल्याचा आनंद व्यक्त करताना शिल्पा शेट्टी म्हणते, “भारत देश एक मोठी ताकद बनण्याच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करत आहे. यावेळी अनेक प्रतिभावान मंडळींचे पाठबळ देशाला आहे, ज्यांनी जागतिक पातळीवर, अगदी AGT (अमेरिकाज गॉट टॅलेंट) मध्येही आधीच स्वतःचे अनोखेपण सिद्ध केले आहे. मग ते डान्स मध्ये असो, संगीतात असो, जादू, स्टंट, कॉमेडी –कोणत्याही क्षेत्रात असो.भारतात प्रतिभा भरभरून आहे. ज्या कार्यक्रमात कोणत्याही स्वरूपातील कलेला दाद दिली जाते अशा इंडियाज गॉट टॅलेंट या शोमध्ये पुन्हा परीक्षक म्हणून परतताना मला खूप आनंद होत आहे.