Home शासकीय शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील ई-पीक पाहणीची नोंदणी पूर्ण करुन घ्यावी

शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील ई-पीक पाहणीची नोंदणी पूर्ण करुन घ्यावी

5 second read
0
0
61

no images were found

शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील ई-पीक पाहणीची नोंदणी पूर्ण करुन घ्यावी

कोल्हापूर  : खरीप हंगामाची प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे करण्यासाठी दिनांक १ जुलै २०२३ पासून सुरुवात करण्यात येत आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२३ साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ई-पीक पाहणी प्रकल्प (पुणे) चे राज्य समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांनी केले आहे.

 ई-पीक पाहणी मोबाईल अॅपच्या सहाय्याने सर्व खातेदार शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरुन आपल्या ७/१२ वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा ई – पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून महाराष्ट्रात राज्यभर राबविण्यात येत आहे. या अॅपमध्ये आतापर्यंत सुमारे १.८८ कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे व आपल्या पिकांची नोंदणी केली आहे.

खरीप हंगाम २०२३ पीक पाहणी नोंदणीसाठी ई – पीक पाहणीचे २.०.११ हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सर्व खातेदार शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील ई-पीक पाहणीच्या नोंदणीसाठी नवीन व्हर्जन अपडेट करुन घेणे आवश्यक आहे, असे ही पत्रकात नमुद आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…