Home शासकीय ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसाठी लोकचळवळ गतिमान-हेमंत पाटील

ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसाठी लोकचळवळ गतिमान-हेमंत पाटील

1 min read
0
0
47

no images were found

ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसाठी लोकचळवळ गतिमानहेमंत पाटील

मुंबई  : बारा बलुतेदार आणि अठरापगड जातींना सोबत घेवून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात सर्व जाती-धर्माचे विशेष असे स्थान आहे.छत्रपति-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांनी पुरोगामी झालेला महाराष्ट्र देशातील इतर राज्यांसाठी मार्गदर्शक आहे. सामाजिक क्रांतीच्या चळवळीचा साक्षीदार असलेल्या राज्यातून आता ओबीसींचे एक मोठे आंदोलन उभे राहत आहे,असे प्रतिपादन ओबीसीने नेते, इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आयएसी) राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शनिवारी केले.

जातनिहाय जनगणनेच्या मागणीची पुर्तता करणे हे या आंदोलनाचा पहिला टप्पा असून राज्यातील दिग्गज नेत्यांना जे जमले नाही ते पुर्णत्वास नेण्याचे काम आता समाजबांधव करतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.मंडल आयोगाने देशाला दिशा देण्याचे काम केले. आता याच दिशेने ओबीसींना घेवून जाण्याचे काम आयएसीकडून केले जाईल.स्व.गोपीनाथराव मुंड यांनी या अनुषंगाने प्रयत्न केले पंरतु छगन भूजबळ,चंद्रशेखर बावणकुळे,नाना पटोल, पंकजा मुंडे, जितेंद्र आव्हाड,धनंजय मुंडे आणि इतर ओबीसी नेत्यांना सत्तेत राहून देखील जे काम शक्य झाले नाही,ते करण्याचा वसा संघटनेने घेतला असल्याचे पाटील म्हणाले.

संघटनेकडून करण्यात येणाऱ्या ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसाठी पुढाकाराच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.अनेक स्वयंसेवकांनी यासाठी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.अनेक संघटना समोर आल्या आहेत.आता थेट कार्याला सुरूवात करीत ओबीसींना लोकसंख्येनिहाय प्रतिनिधित्व मिळवून देण्याचे लोकआंदोलन खऱ्या अर्थाने सुरू झाले असल्याचे पाटील म्हणाले.

पंरतु,अद्याप कुठल्याही राजकीय पक्षाने संघटनेच्या या आवाहनाला सकारात्मकता दर्शवलेली नाही.राजकारण्यांना ओबीसींचा पुळका केवळ राजकीय मतांसाठीच असल्याचे यावरून स्पष्ट होते.ओबीसींच्या न्याय मागण्यांसाठी अखेरपर्यंत

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जपानी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री 

जपानी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न – मुख्यम…