no images were found
समृद्धीवरील अपघातांची आकडेवारी मांडून सरकारला तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे सुचवले होते ;शरद पवारांनी सरकारला करुन दिली आठवण…
मुंबई :- बुलढाणा येथील दुर्दैवी घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात अशी मागणी करतानाच एक आठवड्यापूर्वीच संबंधित विभागाकडून होत असलेल्या अपघातांची आकडेवारी मागवून चिंता व्यक्त केली होती व अपघात रोखण्याच्यादृष्टीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे सुचवले होते याची आठवण ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी सरकारला करुन दिली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा पिंपळखुटा भागात समृध्दी महामार्गावर लक्झरी बस उलटून भीषण अपघात झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे अशा शब्दात शोक व्यक्त करतानाच या अपघातात २५ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली शरद पवार यांनी वाहिली व अपघातातील जखमींवर लवकरात लवकर उपचार होऊन ते बरे व्हावेत अशी प्रार्थनाही केली.