no images were found
प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीवर अशासकीय सदस्यांची नेमणुकीसाठी 15 जुलै पर्यंत अर्ज सादर करावेत
कोल्हापूर : जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीचा कार्यकाल समाप्त झाला असून सदस्यांची नेमणूक करण्यासाठी जिल्ह्यातील प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या/ प्राणी कल्याणाकरिता योगदान देणाऱ्या इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. गृह विभाग (पोलीस), कोल्हापूर जिल्हा यांचेमार्फत अर्जदाराची चारित्र्य पडताळणीस अधीन राहून राज्य शासनाकडे समितीवर नेमणुकीसाठी शिफारस करण्यात येईल.
विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, ताराबाई पार्क, कोल्हापूर या कार्यालयात दिनांक १५ जुलै २०२३ पर्यंत सादर करावेत. अर्जाचा नमुना एनआयसी, कोल्हापूर यांच्या पोर्टलवर तसेच या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे.
जिल्ह्यातील प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीवर जिल्ह्यातील गोशाळा/ पांजरपोळ संस्थांपैकी एका संस्थेचा अध्यक्ष, प्राणी कल्याणविषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थेचे दोन सदस्य, सर्वसाधारण समितीने नामनिर्देशित केलेल्या दोन व्यक्ती व जिल्ह्यातील मानवहितकारक कार्य करणारे/ प्राण्यांवर प्रेम करणारे/ प्राणी कल्याणासाठी काम करणारे पाच ते सहा कार्यकर्ते. या नवीन अशासकीय सदस्यांची नेमणूक करावयाची आहे.