no images were found
1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स डे
भारतामध्ये 1 जुलै हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. प्रामुख्याने देशात हा दिवस इंडियन मेडिकल असोसिएशन कडून साजरा केला जातो. समाजामध्ये डॉक्टरांचे योगदान फार मोलाचे आहे. मागील दीड वर्ष कोरोना संकटाशी लढताना डॉक्टरांच्या योगदानाचं, त्यांच्या सेवाभावी वृत्तीचं प्रकर्षाने साऱ्यांना महत्त्व पटलं आहे. त्यामुळे या डॉक्टर्स डे च्या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रात आपल्या सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या प्रत्येकाला सलाम करत त्यांच्या कार्याप्रती धन्यवाद म्हटलं जातं. जगभरात डॉक्टर्ड डे साजरा करण्याच्या तारखा वेगवेगळ्या आहेत पण भारतामध्ये हा डॉक्टर्स डे 1 जुलैला साजरा होणार आहे.
भारतामध्ये प्रसिद्ध डॉक्टर डॉ बिधान चंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ त्यांच्या स्मृति प्रित्यर्थ हा डॉक्टर्स डे साजरा केला जातो. 1 जुलै हा डॉ. रॉय यांचा जन्मदिन आणि पुण्यतिथीचा दिन देखील आहे. त्यामुळे त्यांच्या आठवणींना उजाळा देत डॉक्टरांच्या सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नॅशनल डॉक्टर्स डे साजरा केला जातो. 1991 पासून भारतात 1 जुलै हा डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो.
मागील वर्ष, दीड वर्षापासून डॉक्टरांसह आरोग्य सेवक कोविड – नॉन कोविड रूग्णांसाठी आपली सेवा देत आहेत. अनेकांनी आपल्या सुखी, चैनीत सुरू असलेल्या आरोग्य सेवेचा मागील दीड वर्ष पूर्णवेळ रुग्णसेवेला दिली आहेत.
डॉक्टर आणि देव या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे समजण्याचा तो काळ होता. आता त्यांनाच समाज दैत्य समजत आहे. यात डॉक्टरांचा काही दोष नाही, तर दोष आजच्या समाजव्यवस्थेचा आहे. यात वैद्यकीय व्यवसाय हा डॉक्टरांच्या हातात न राहता औषध उत्पादक कंपन्या, विविध तपासण्या करणाऱ्या लॅब्ज आणि विमा कंपन्यांच्या हातात गेल्यामुळे तेसुद्धा मनात नसताना या दुष्टचक्रात अडकले आहेत. ‘डॉक्टर्स डे हा दिवस आता महत्त्वाचा वाटतो. डॉक्टर्स डे त्यांच्यासाठीचा सुद्धा खूप महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस समाजासाठी, देशासाठीच्या सेवेला पुनर्जन्म देतो. हा व्यवसाय सुरू करताना मनुष्यजातीची सेवा हा ध्यास असतो. पण काही काळानंतर ते ही गोष्ट विसरून जातात. तत्वज्ञान सोडून भ्रष्टाचारी बनतात. हा दिवस अशा भरकटलेल्या डॉक्टरांना आदर्श मार्गावर परत आणण्याचाही दिवस आहे. सध्या डॉक्टर व रुग्णांचे संबंध बिघडत चालले आहेत. लोकांचा डॉक्टरांवरचा विश्वास उडत चालला आहे. लोकांना मिळालेल्या अपुऱ्या माहितीमुळे या घटना घडत आहेत. डॉक्टरांचे यश नजरेआड करून लोक त्यांच्या चुका दाखवत आहेत. यासाठी लोकांनीही डॉक्टरांना समजून घेण्याची गरज आहे.
भारतात 1991 पासून 1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा करण्यात येतो. प. बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधनचंद्र रॉय यांनी वैद्यकीय व्यवसायात केलेल्या अद्वितीय व संस्मरणीय कामगिरीमुळे हा दिवस निवडण्यात आला. त्यांचा जन्म 1 जुलै 1882 व मृत्यू 1 जुलै 1962 रोजी झाला. 80 वर्षाचे असताना त्यांची 1 फेब्रुवारी रोजी सर्वोत्तम कामगिरीबद्दल सर्वोत्तम नागरिक म्हणून निवड करण्यात आली. ते थोर स्वातंत्र्य सेनानी होते. महात्मा गांधींसोबत केलेल्या अनेक सत्याग्रहांमध्ये ते सहभागी झाले होते. त्यांनी केलेल्या अमूल्य कामगिरीबद्दल वाहिलेली ही श्रद्धांजली आहे.