Home सामाजिक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट

1 second read
0
0
40

no images were found

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट

कोल्हापूर  : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मुंबई मुख्यालयास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी भेट दिली. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते तसेच महामंडळाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत प्रामुख्याने मराठा समाजाकरिता कार्यरत असणाऱ्या व्याज परतावा योजनांची सविस्तर माहिती, योजनांची कार्यपध्दती मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली. यावेळी प्रत्यक्षात मंत्री महोदयांनी संगणकावर बसून LOI निर्माण करण्याची प्रक्रीया, कर्ज मंजूरीची प्रक्रीया, व्याज परतावा कशा प्रकार देण्यात येतो याची प्रक्रीया सविस्तर समजून घेतली व लगेचच 4 हजार 333 लाभार्थ्यांना 3 कोटी 75 लाख रुपये व्याज परताव्याची रक्कम स्वत: लाभार्थ्यांना वितरीत केली व महामंडळाच्या योजनांतर्गत आजपर्यत 61 हजार 411 लाभार्थ्यांना बँकेने वितरीत केलेल्या 4 हजार 367 कोटी रूपयांच्या कर्ज रक्कमेबाबत व महामंडळाने 50 हजार 285 लाभार्थ्यांना व्याज परतावा स्वरुपात वितरीत केलेल्या 456 कोटी रूपये रक्कमेचे अवलोकन करुन महामंडळाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

मुख्यालयात भेट दिल्यानंतर मंत्री महोदयांनी महामंडळाच्या मुख्यालयाच्या जागेबद्दल चर्चा केली व महामंडळाकरिता लवकरच नवी मुंबई सारख्या शहरामध्ये भव्य इमारतीकरिता जागा उपलब्ध करुन देण्याकरिता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत चर्चा करणार असल्याचे सांगितले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…