Home धार्मिक सनातन संस्थेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ३ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन  – डॉ. मानसिंग शिंदे, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ३ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन  – डॉ. मानसिंग शिंदे, सनातन संस्था

2 second read
0
0
49

no images were found

सनातन संस्थेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ३ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन  – डॉ. मानसिंग शिंदे, सनातन संस्था

कोल्हापूर – हिंदु राष्ट्र अर्थात धर्मनिष्ठ समाज निर्मितीसाठी प्रयत्न करणे, ही काळानुसार सर्वोत्तम गुरुसेवाच आहे. हा संदेश देण्यासाठी ‘सनातन संस्थे’च्या वतीने सोमवार, 3 जुलै 2023 या दिवशी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हे महोत्सव कोल्हापूर जिल्ह्यात 3 ठिकाणी आणि कर्नाटकमधील निपाणी या ठिकाणी सायंकाळी 5.30 वाजता होणार आहेत, अशी माहिती सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे यांनी दिली आहे.

या महोत्सवांची ठिकाणे पुढीलप्रमाणे आहेत

१. इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन, लकी बझारच्या माडीवर, राजारामपुरी, कोल्हापूर.

२. विनायक प्लझा, देसाई मंगल कार्यालय, गडहिंग्लज.

३. नृसिंह मंदिर, मलकापूर.

४. महादेव मंदिर सांस्कृतिक भवन, महादेव गल्ली, निपाणी.

हिंदु धर्मातील अद्वितीय अशी श्रेष्ठ परंपरा म्हणजे ‘गुरु-शिष्य परंपरा’! आर्य चाणक्य यांनी सम्राट चंद्रगुप्त, तर समर्थ रामदासस्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माध्यमातून तत्कालीन सामाजिक अन् धर्मांध दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन केले आणि सुराज्य स्थापन केले. आजही समाज, राष्ट्र अन् धर्म यांची स्थिती दयनीय आहे. लोकशाहीतील जनतेचे शोषण करणार्‍या दुष्प्रवृत्तींविरुद्ध कृती करणे आणि रामराज्यासम ‘हिंदु राष्ट्र’ स्थापणे यांसाठी गुरूंच्या आशीर्वादाने कृतीशील होण्याचा संकल्पदिन म्हणजे गुरुपौर्णिमा होय !

महोत्सवाचे स्वरूप – या महोत्सवात श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन); समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयी मान्यवरांचे विचार; तसेच ‘संवैधानिक आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा संकल्प करा’ या विषयांवर मान्यवर वक्त्यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे. तरी हिंदूंनी या गुरुपौर्णिमा महोत्सवांत सहभागी व्हावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…