no images were found
भारतातील १० पैकी ९ ग्राहकांना सुरक्षितता रेटिंग असलेल्या कार्सना प्राधान्य
मुंबई : वैयक्तिक कारची निवड करताना ग्राहक प्राधान्य देणाऱ्या वैशिष्ट्याबाबत जाणून घेण्यासाठी ग्राहकांमध्ये संशोधन करण्यात आले. हे सर्वेक्षण स्कोडा ऑटो इंडियाने सुरू करण्यासोबत एनआयक्यू बेसेसने आयोजित केले होते. या संशोधनामधून ग्राहकांची कारच्या सुरक्षितता वैशिष्ट्यांप्रती अधिक पसंती निदर्शनास आली. १० पैकी ९ ग्राहकांचे मत होते की, भारतातील सर्व कार्सना सुरक्षितता रेटिंग असले पाहिजे. सर्वेक्षणातील निष्पत्तींमधून निदर्शनास आले की, क्रॅश-रेटिंग्ज आणि एअरबॅग्जची संख्या ही ग्राहकांच्या कार खरेदी करण्याच्या निर्णयाला चालना देण्यामध्ये अव्वल दोन वैशिष्ट्ये होती. लोकप्रिय वैशिष्ट्यांपैकी एक इंधन कार्यक्षमता तिसऱ्या स्थानी होते.
जवळपास ६७ टक्के प्रतिसादकांमध्ये ५ लाख रूपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या कारचे मालक असलेल्या विद्यमान कारमालकांचा समावेश होता. काही ३३ टक्के प्रतिसादक कारचे मालक नव्हते, पण वर्षभरात ५ लाख रूपयांपेक्षा अधिक किंमत असलेली कार खरेदी करण्याची इच्छा होती. सेक्शन ए व बी श्रेणीअंतर्गत १८ ते ५४ वर्ष वयोगटातील व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले, जेथे ८० टक्के प्रतिसादक पुरूष आणि २० टक्के प्रतिसादक महिला होत्या.
ग्राहकांच्या कार खरेदी करण्याच्या निर्णयामध्ये २२.३ टक्क्यांच्या महत्त्वपूर्ण स्कोअरसह कारचे क्रॅश रेटिंग अव्वलस्थानी होते, ज्यानंतर २१.६ टक्क्यांच्या महत्त्वपूर्ण स्कोअरसह एअरबॅग्जचा क्रमांक होता. कार खरेदी करताना इंधन कार्यक्षमता १५.० टक्क्यांच्या महत्त्वपूर्ण स्कोअरसह तिसरा सर्वात महत्त्वपूर्ण घटक ठरला.
कार्ससाठी क्रॅश रेटिंगसंदर्भात ग्राहकांची ५ स्टार रेंटिंगकरिता सर्वाधिक २२.२ टक्के पसंती दिसण्यात आली, ज्यानंतर ४-स्टार रेटिंगकरिता २१.३ टक्के पसंती होती. शून्य क्रॅश रेटिंग फक्त ६.८ टक्के स्कोअरसह सर्वाधिक कमी पसंतीचे आहे.
स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रॅण्ड संचालक पीटर सोलक म्हणाले, स्कोडामध्ये आम्ही सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देतो आणि सुरक्षित कार्स निर्माण करण्याचे आमचे तत्त्व आहे. सर्वेक्षणामधून निदर्शनास येते की, स्कोडा उच्च सुरक्षितता रेटिंग्जसह मॉडेल्स असलेल्या टॉप-३ ब्रॅण्ड्समध्ये असण्याची शक्यता आहे. भारतातील झपाट्याने वाढत्या पायाभूत सुविधा आणि भारतातील स्वत:च्या क्रॅश-टेस्टिंग मानकांसाठी आगामी प्रस्तावांसह ग्राहक मागणीदायी सुरक्षितता वैशिष्ट्यांबाबत जागरूक असल्याचे पाहून आनंद होत आहे. स्कोडा भारतीय बाजारपेठेत ब्रॅण्ड विकसित करण्यासाठी या मूल्यांवर लक्ष केंद्रित करत राहिल.
भारत सरकार आणि इतर नियामकांकडून सुरक्षिततेवर प्रमुख लक्ष केंद्रित करण्यासह ग्राहकांना कार्सच्या सुरक्षिततेबाबत असलेली माहिती जाणून घेण्यासाठी हे संशोधन करण्यात आले. सर्वेक्षणामध्ये ग्राहकांच्या निवडीला चालना देण्यामध्ये सर्वाधिक प्राधान्य दिल्या जाणाऱ्या वैशिष्ट्यांची तपासणी करण्यात आली. आणि वैशिष्ट्यांच्या या यादीमध्ये सुरक्षितता अव्वलस्थानी होते.