
no images were found
बकरी ईदनिमित्त राज्यात या शहरांवर नजर ठेवण्याचे आदेश
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पोलीस महासंचालकांना पत्र पाठवलं आहे. बकरी ईदनिमित्त राज्यात गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करा असे आदेश या पत्राद्वारे देण्यात आले आहेत.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पोलीस महासंचालकांना एक पत्र लिहीलं आहे. या पात्रात महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत. गोवंश हत्या बंदी कायदा उल्लंघनाच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे बकरी ईद निमित्त राज्यात गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी. मालेगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, धाराशिव, धुळे, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये काटेकोर अंमलबजावणी करावी असं नार्वेकर यांनी म्हटलं आहे.