no images were found
न्यू पॉलिटेक्निकमध्ये सायबर सिक्युरिटी व इंटेरिअर डिझाईन कोर्सेस सुरू
कोल्हापूर : ( प्रतिनिधि )श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकमध्ये महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई संलग्नित कौशल्याधारित व्यवसायाभिमुख अल्पमुदतीचे पदविका कोर्सेस शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून सुरू होत आहेत. डिप्लोमा किंवा बी. एस्सी. नंतरचा एक वर्ष मुदतीचा Advanced Diploma in Cyber Security Management आणि इयत्ता दहावी नंतरचा दोन वर्ष मुदतीचा Diploma in Interior Designing and Decoration हे व्यवसायाभिमुख कोर्सेस उपलब्ध झाले आहेत.
या कोर्सेस विषयी माहिती देताना प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे म्हणाले की ‘सध्याचे युग हे डिजिटल आहे. आर्थिक व्यवहार, माहितीची देवाणघेवाण, संपर्क, सेवा अशा सर्वच क्षेत्रात संगणक व इंटरनेटच्या सहाय्याने कामे होत असतानाच याच माध्यमातून फसवणुकीचे गुन्हे वाढत आहेत. अशा गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी किंवा गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी सायबर तज्ञांची गरज वाढती आहे. Cyber Security Management हा कोर्स यासाठी सक्षम आहे. त्याचबरोबर घरगुती व व्यावसायिक बांधकामांमध्ये उपयुक्ततेसोबतच सुशोभीकरणासाठी ग्राहकांच्या अपेक्षा वाढत आहेत. यासाठी Diploma in Interior Designing and Decoration हा कोर्स अत्यंत उपयुक्त आहे.’
संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील यांनी प्रतिपादन केले की ‘होतकरू विद्यार्थ्यांना तत्काळ नोकरी मिळवण्याची व आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी यानिमित्ताने प्राप्त झाली आहे’.
या दोन्ही कोर्सेसच्या प्रत्येकी ६० जागा उपलब्ध आहेत आणि विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी न्यू पाॅलिटेक्नीकशी संपर्क साधावा असे संस्थेने कळविले आहे.