
no images were found
स्कोडाकडून डिलिव्हरी वेळ वेगवान करण्यासाठी कोडियाक च्या पुरवठ्यामध्ये अधिक वाढ
मुंबई, : २०२३ कोडियाक लाँच केल्यानंतर लवकरच स्कोडा ऑटो इंडियाने भारतासाठी लक्झरी ४x४ एसयूव्हीच्या अतिरिक्त वाटपाची घोषणा केली आहे, ज्यामुळे ग्राहकांना जलदपणे डिलिव्हरी करता येईल. नवीन कोडियाक प्रथम २०२२ मध्ये लाँच करण्यात आली. पण वर्षासाठी वाटप करण्यात आलेल्या सर्व कार्सची विक्री काही आठवड्यांमध्येच झाली. वाढत्या मागणीला उत्तम प्रतिसाद देत कंपनीने भारतात २०२३ साठी पुरवठ्यांमध्ये अधिक वाढ केली आहे. भारत स्कोडा ऑटोसाठी तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ आणि जर्मनी व झेक रिपब्लिकनंतर युरोपबाहेरील सर्वात मोठा देश आहे
स्कोडा कोडियाकमध्ये २.० टीएसआय ईव्हीओ इंजिनची शक्ती आहे, जे नवीन उत्सर्जन नियमांची पूर्तता करते. मोटर पूर्वीपेक्षा आता ४.२ टक्के अधिक कार्यक्षम आहे. लक्झरी ४x४ एसयूव्ही १४० केडब्ल्यू (१९० पीएस) शक्ती आणि ३२० एनएम टॉर्क देते, ज्यामुळे फक्त ७.८ सेकंदांमध्ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्त करते (दावा केलेली आकडेवारी). स्कोडा ब्रॅण्डच्या सिम्प्ली क्लेव्हर वैशिष्ट्यांच्या श्रेणीमध्ये आणखी एका नवीन वैशिष्ट्याची भर करण्यात आली आहे – डोअर-एज प्रोटेक्टर्स. दरवाजे उघडताना आपोआपपणे उघडले जातात, ज्यामुळे दरवाजावरील कडांचे डेंट्स व स्क्रॅचेसपासून संरक्षण होते. रिअर स्पॉइलरमध्ये एअरफ्लोची भर करण्यासाठी आणि या लक्झरी ४x४ एसूयव्हीची एरोडायनॅमिक्स सुधारण्यासाठी अतिरिक्त फिनलेट्सचा समावेश करण्यात आला आहे. आतील बाजूस मागील आसनांवरील प्रवाशांना त्यांच्या पायांना आराम मिळण्याकरिता लाऊंज स्टेप आणि दुसऱ्या आसन रांगेत आऊटर हेडरेस्ट्स आहे, ज्यामुळे कुटुंबासाठी या ४x४ मध्ये लक्झरी व आरामदायीपणा दर्जा अधिक वाढतो.
ड्रायव्हर सहभाग व फिल वाढवणारा तंत्रज्ञानाने युक्त कोडियाकचा वारसा प्रोग्रेसिव्ह स्टिअरिंगसह कायम आहे. हे स्टिअरिंग ड्रायव्हिंग स्थिती व वाहनाच्या गतीनुसार फोर्सेसमध्ये बदल करते, ज्यामुळे कोडियाक कमी गतीमध्ये देखील सहजपणे ड्राइव्ह करता येते, तसेच ड्रायव्हरला उच्च गतीमध्ये सर्वोत्तम नियंत्रण देते. याव्यतिरिक्त फर्स्ट-इन-सेगमेंट डायनॅमिक चेसिस कंट्रोल कोडियाक च्या गतीशीलतेवर नियंत्रण ठेवते. ड्रायव्हरला इको, कम्फर्ट, नॉर्मल, स्पोर्टस्, स्नो व इंडिव्हिज्युअल ड्रायव्हिंग मोड्स अशा ६ विविध मोड्समधून निवड करण्याची सुविधा देण्यासोबत डीसीसी सस्पेंशन १५ मिमीने वाढण्यास किंवा कमी होण्याची सुविधा देखील देते आणि गरजेच्या वेळी सर्व प्रदेशामधील ड्रायव्हिंग क्षमता वाढवण्यासाठी ऑफ-रोड बटनची सुविधा देते.
कोडियाक सह स्लाव्हिया व कुशक स्कोडा ऑटो इंडियाच्या क्रॅश-टेस्टेड कार्सच्या ताफ्याला परिपूर्ण करतात. या सर्व कार्स प्रौढ व्यक्ती व मुलांच्या सुरक्षिततेसाठी ५-स्टार रेटेड आहेत.