
no images were found
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी राज्य एसटी महामंडळाकडून तयारी
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी भाविकांसाठी राज्य एसटी महामंडळाकडून तयारी करण्यात आली आहे. आषाढी यात्रेचे औचित्य साधून दरवर्षी लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येत असतात.
महाराष्ट्रसह इतर राज्यातील लाखो भाविक दरवर्षी वारीमध्ये सहभागी होतात. यंदा देखील आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो भाविक पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले आहेत
एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. या भाविकांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.
यात्रेसाठी राज्य एसटी महामंडळाकडून विविध आगारातून जवळपास 5000 बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी 25 जूनपासून एसटीच्या जादा फेऱ्या या पंढरपूर मार्गाने होणार आहेत. 3 जुलै पर्यंत ही जादा वाहतूक सुरू राहणार आहे.