
no images were found
कोल्हापूरची हवाई कनेक्टीव्हीटी वाढवावी; कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने मागणी
कोल्हापूरची हवाई कनेक्टीव्हीटी वाढवावी, कोल्हापूर- मुंबई वंदे भारत ट्रेन चालू करावे यासह विविध मागण्या कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंधिया यांच्याकडे करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष नितीन धूत,सचिव लालचंद गट्टानी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी अध्यक्ष चंदनमलजी मंत्री,श्रीकांत मंत्री,महेश सेवा समितीचे अध्यक्ष नंदकिशोर भुतडा, बनवारीलाल झंवर, सुरेशचंद दरगड,अशोक मंत्री,मुकेश खाबानी,श्रीकांत बंग,सुरेंद्र हेडा,जुगल भांगडिया,रामपाल भंडारी,हरीश सारडा उपस्थित होते.
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंधिया इचलकरंजी दौऱ्यावर आले होते. या भागातील व नागरिक व उद्योजकांच्या सोयीसाठी कोणकोणत्या सोयी सुविधांची आवश्यकता आहे याबाबतचे सविस्तर निवेदन त्यांना देण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने जयपुर-अजमेर थेट विमानसेवा करण्यासाठी प्रयत्न करावे.कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस परत चालू करण्यासाठी प्रयत्न करावे,कारण पुणे मुंबई मध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यासाठी अति उपयुक्त आहे.कोल्हापूर- मुंबई वंदे भारत ट्रेन चालू करावे.कोल्हापूर – कोकण रेल्वेला जोडण्यासाठी कोल्हापूर – वैभववाडी मार्ग मंजूर झाला आहे मात्र त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, तरी या मार्गाचे काम त्वरित सुरू करावे अशा मागण्या करण्यात आल्या याबाबत आपण पाठपुरावा करून हे प्रश्न सोडवावेत अशी शिष्टमंडळाच्या वतीने विनंती करण्यात आली. मंत्री सिंधिया यांनी आपल्या मागण्या बाबत संबंधित विभागाकडे आपण पाठपुरावा करू असे आश्वासन दिले