
no images were found
शहरी भागात पंतप्रधान आवास योजना सुरु करावी
शहरी भागात घर खरेदी करणाऱ्या सामान्य नागरिकास पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अनुदान मिळावे तसेच अफोर्डेबल हौसिंगचे G .S .T चे दर हे किमतीवर न ठरवता क्षेत्रफळावर ठरावेत अश्या विविध मागण्याचे निवेदन केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री श्री जोतिरादित्य सिंधिया यांना बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे चेअरमन नितीन धूत व क्रेडाई इचलकरंजीचे अध्यक्ष मयूर शहा यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.यावेळी खासदार धनंजय महाडिक,आमदार प्रकाश आवाडे,माजी आमदार सुरेशराव हाळवणकर हे उपस्थित होते.
मंत्री महोदयांच्या इचलकरंजी दौऱ्यावेळी माननीय जोतिरादित्य सिंधिया यांनी बांधकाम व्यवसायिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन सर्व समस्याचें निराकारण करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी क्रेडाईचे व बिल्डर अससोसिएशनचे फैय्याज गैबान,सम्मेद मगदुम ,दिलीप पटेल ,रणजीत लायकर ,सुधीर लाटकर ,जहिर सौदागर ,रमेश मर्दा ,राजू पाटील ,भगवान कांबुरे मितेश बलवान ,पुंडलिक जाधव ,सौरभ जाधव ,पन्नालाल डाळ्या ,पवन डाळ्या ,राजेंद्र शिंत्रे, सुहास अकिवाटे ,तानाजी हराळे ,श्रेणिक मगदूम ,श्रेणिक शहा ,विकास चंगेडिया उपस्थित होते .