
no images were found
कै. बाबुराव जोशी स्मृति कोल्हापूर जिल्हा महिला निवड बुद्धिबळ स्पर्धा
कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने चेस असोसिएशन कोल्हापूरनेे आयोजित केलेल्या कै.बाबुराव जोशी स्मृति जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा आज उत्साहात सुरु झाल्या.या स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धा पुरस्कर्त्या श्रीमती शिल्पा जोशी पुसाळकर व जिल्हा बुद्धिबळ संघटनेचेे अध्यक्ष प्राध्यापक अरुण मराठे यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले.यावेळी आंतरराष्ट्रीय पंच मनीष मारुलकर,धीरज वैद्य,उत्कर्ष लोमटे व आरती मोदी उपस्थित होते.यावेळी नागपूर येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र बुद्धिबळ महाराष्ट्र महोत्सव अंतर्गत झालेल्या सोळाशे गुणांकनाखालील स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलेली दिशा पाटील आठवे स्थान पटकाविलेली शर्वरी कबनूरकर व दोन हजार गुणांकनाखालील स्पर्धेत चांगली कामगिरी केलेल्या दिव्या पाटील यांचा सत्कार शिल्पा जोशी-पुसाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
आज झालेल्या तिसऱ्या फेरीनंतर अग्रमानांकित जयसिंगपूर ची दिव्या पाटील तृतीय मानांकित कोल्हापूरची शर्वरी कबनूरकर व पाचवी मानांकित कोल्हापूरची महिमा शिर्के तीन गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.द्वितीय मानांकित दिशा पाटीलजयसिंगपूर,चौथी मानांकित अरीना मोदी कोल्हापूर,श्रद्धा पाटील,तमदलगे,सांची चौधरी इचलकरंजी,श्रुती कुलकर्णी जयसिंगपूर,श्रावणी कोडोले नांदणी व संस्कृती सुतार नांंदणी या सातजणी दोन गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.