no images were found
कोल्हापुर जिल्ह्यातील कागल शहरात तणावपूर्ण वातावरण; आक्षेपहार्य स्टेटस ठेवल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
कोल्हापूर: राजर्षी शाहू महाराजांची जनक भूमी असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरातील एका ३८ वर्षीय तरुणाने टिपू सुलतानचे व्हाट्सअप स्टेटस ठेवल्याने कागल शहरात रात्री पुन्हा तणाव निर्माण झाला. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या.
हिंदुत्ववादी संघटनांनी संशयताला त्वरीत ताब्यात घेण्याची मागणी पोलिसांकडे केली, तसेच कागल बंदची हाक देण्यात आली होती.मात्र पोलिसांनी देखील याची तत्काळ दखल घेत संशयताला ताब्यात घेतले.मध्यरात्री साडेबारा वाजेपर्यंत झालेल्या बैठकीनंतर शहरातील सर्व संघटनांनी कागल शहर बंद करणार नसल्याचे स्पष्ट केले.
मात्र सोशल मीडियावर सकाळी साडेनऊ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी शहरातील मुख्य चौकांमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करत एकत्र जमण्यासाठी पोलिसांनी मज्जाव केल्याने शहरात तणावपूर्ण शांतता आहे