no images were found
उपवडे लघुपाटबंधारे तलावासाठी उपसाबंदी
कोल्हापूर : पंचगंगा पाटबंधारे उपविभाग, कोल्हापूर अंतर्गत उपवडे ल.पा. तलाव येथील जलाशयातील पाण्यावर व डी.पी.वर शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर दि. 3 जून 2023 ते पुढील आदेश होईपर्यंत उपसा बंदी करण्यात आली असल्याची माहिती पंचगंगा पाटबंधारे उपविभागाचे सहायक अभियंता संदिप दावणे यांनी दिली आहे.
जिल्ह्यात उपसाबंदी अंमलात आणावयाच्या कार्यक्षेत्रातील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील अधिकारी व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी उपवडे ल.पा. तलाव येथील जलाशयातील सर्व तीरावर 3 जून पासून शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या विद्युत उपसायंत्राची तारामंडळे काढून घ्यावीत. तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उपसा तेल यंत्रांना सिल करावे व आदेशातील उपसा बंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी.
उपसाबंदी कालावधीत अनधिकृत उपसा आढळून आल्यास संबंधित उपसायंत्रधारकाचा उपसा परवाना एक वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नाही, असेही पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.