
no images were found
डिजीटल कॅलिग्राफी आणि फलक लेखनाला दुसऱ्या दिवशीही उस्फुर्त प्रतिसाद
कोल्हापूर(प्रतिनिधी) : माझी शाळा माझा फळा समूह व शिवाजी विद्यापीठ संगीत व नाट्यशास्त्र विभाग, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठामध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनाची सुरवात डीजीटल कॅलीग्राफीने झाली. नाशिक येथील सचिन गडाख व सोलापूरचे अमित भोरखडे यांनी उपस्थितांना डीजीटल कॅलीग्राफीमध्ये देवनागरी व इंग्रजीसाठी ब्रश कसा निवडावा ? कोणती सॉफ्टवेअर वापरावीत याविषयी प्रात्याक्षिकासह बहुमोल मार्गदर्शन केले. मुंबई येथील जेष्ठ सुलेखनकार श्री. अनिल गोवळकर
यांनी पेन्सील व ब्रश कॅलीग्राफीमधील दोष कसे टाळावे व उत्तमरीत्या सुलेखन कसे करावे ? याविषयी प्रात्याक्षिकासह मार्ग्दर्शन केले. ऋषिकेश उपळावीकर या तरुण कलाकाराने कॅरीकेचर करून उपस्थितांची वाहवा मिळविली, त्याचबरोबर हेमंत घरात (मुंबई) सचिन सावंत (मुंबई), श्रीकांत गवांडे (मुंबई) यांनी पपेर कॅलीग्राफी तर मोहन हिरुरकर (अमरावती) व गणेश माने (पुणे) यांनी लाईव्ह स्केच काढली.
कोल्हापूरच्या अशांत माने यांनी तांदूळ व सुपारीवर काढलेली चित्रे आजच्या दिवसाचे आकर्षण ठरले. मुंबई येथील श्री. सुनील सूर्यवंशी या कलाकाराने शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव मा.डॉ.व्ही.एम.शिंदे यांचे प्रत्यक्ष रेखा चित्र रेखाटले. श्री. वसंत अकोलकर यांनी कोलाज प्रकाराची प्रात्याक्षिके सादर केली दुपारच्या सत्रामध्ये सतीश उपळावीकर (कराड), मोहन कांबळे (कोल्हापूर) दीपक गोंधळे (अहमदनगर), महेंद्र शिरोडकर (गोवा) यांनी उपस्थितांसमोर छत्रीवरील सुलेखन व रोल पेपर वरील प्रात्याक्षिके सादर केली. आजच्या दिवशी या संपूर्ण कार्यक्रमाला मा. व्यंकटेश भट (सहसचिव , गृहविभाग, मंत्रालय मुंबई ) मा . कैलास बिलोणीकर (सहसचिव, मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय) व मा. संजय इंगळे (सहसचिव, महसुल व वनविभाग महाराष्ट्र राज्य) यांची प्रमुख उपस्थिती लागली. आजच्या संमेलन दिवशी राज्यभरातील सर्व कलाकारांच्या मनोरंजनासाठी संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांच्या बहारदार अश्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
२६ मे २०२४ रोजीचे कार्यक्रम- ह्याप्पी आर्ट मॉर्निंग, निसर्गचित्र प्रात्यक्षिक तसेच अक्षर सन्मान सोहळा , अक्षर संमेलन समारोप