
no images were found
बोधचिन्ह वापरून फसवणुक
कोल्हापूर(प्रतिनिधी) : खासगी क्रीडा प्रशिक्षकाकडून सानिका सरनोबत या विद्यार्थिनीस शिवाजी विद्यापीठाचे बनावट प्रमाणपत्र देण्यात आल्याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे संबंधित क्रीडापटू व पालकांची तक्रार प्राप्त झाली आहे. हा प्रकार गंभीर असून विद्यापीठ त्या अनुषंगाने योग्य ती खातरजमा करून पोलीसांत तक्रार दाखल करेल.
यासंदर्भात कळविणेत येते की, शिवाजी विद्यापीठाच्या सेवेत नसलेल्या एका खासगी प्रशिक्षकाने सदर महिला क्रीडापटूस शिवाजी विद्यापीठाचे बोधचिन्ह वापरून बनावट, अनधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले असल्याची तक्रार संबंधित विद्यार्थिनी आणि तिच्या पालकांनी विद्यापीठ प्रशासनाकडे दाखल केलेली आहे. सदर विद्यार्थिनी क्रीडापटूचा विद्यापीठाच्या संघामध्ये समावेश नव्हता. त्यामुळे कोणत्याही आंतरविद्यापीठ स्पर्धेत तिने शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले नाही. सबब, शिवाजी विद्यापीठाने तिला कोणत्याही स्वरुपाचे प्रमाणपत्र देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. सदर बाब गंभीर स्वरुपाची असून त्या संदर्भात प्राप्त तक्रारीची लवकरात लवकर योग्य ती शहानिशा करून त्या अनुषंगाने विद्यापीठाच्या बोधचिन्हाचा फसवणुकीसाठी गैरवापर केलेबाबत पोलीसांत तक्रारही दाखल करण्यात येईल.