
no images were found
हिंदुत्ववादी संघटनेने पुकारलेल्या बंदला हिंसक वळण,पोलिसांचा लाठीचार्ज
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरातील सदर बाजार आणि अकबर मोहल्ला या परिसरात राहणाऱ्या तरुणांनी मोबाईलवर जातीय तेढ निर्माण होणारे स्टेटस ठेवल्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली असून आज कोल्हापूर मध्ये पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागले आहे.शिवाजी पुतळा ते सी.पी.आर परिसरात काही समाजकंटकांनी तोडफोड केली आली. शिवाय याचे पडसाद हे कोल्हापूरमधील विविध भागांमध्येही उमटले.यात शिवाजी चौक परिसरातील दुकान,महापालिका चौक येथील दुकान फोडले.लक्षतीर्थ येथेही गाड्यांची तोडफोड करण्यात आली.या समाजकंटकांना व जमावाला पांगविण्यासाठी आज पोलिसांनी लाठीमार केला.यावेळी रस्त्यावर चप्पल सर्वत्र पडले होते.शिवाय दगड व काचा रस्त्यावर पडलेले होते.
काल हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करत संशयितांना अटक करावी अशी मागणी केली.अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कोल्हापूर शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.त्यानंतर आक्रमक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हे कृत्य करणाऱ्यास अटक करावी अशी मागणी केली होती.यामध्ये पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
एन शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशीच कोल्हापूर सारख्या पुरोगामी नगरीत असा प्रकार घडल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज बुधवारी समस्त कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली होती.त्यानुसार आज शिवाजी चौक,अकबर मोहल्ला, भाऊसिंगजी रोड आणि शहरातील सर्वच ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आज तैनात करण्यात आला होता.हिंदुत्ववादी कार्यकर्ते शिवाजी चौकात सकाळी दहा वाजता आले असंख्य कार्यकर्ते यावेळी जमा झाले होते.यात कार्यकर्त्यांनी दगडफेक केली.जमावाला नियंत्रित ठेवण्यासाठी व पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार हा केला.आज दिवसभर कोल्हापूर मध्ये तणावपूर्ण शांतता होती.बंद कडकडीत पाळण्यात आला होता.दगडफेक केल्याचे सर्वत्र कोल्हापूर मध्ये पसरताच लोक घराबाहेर आले नाहीत दुपारनंतर परीस्थिती आटोक्यात आली होती.काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा होत्या काही शाळा सुरू होणार होत्या.या शाळा बंद ठेवण्यात आल्या.मुलांची गैरसोय ही के एम टी अभावी झाली.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री.राहुल रेखावार यांनी कोल्हापूर ही शाहू महाराजांची नगरी आहे.या नगरीत घडलेला हा प्रकार चुकीचा आहे.परिस्थिती शांततेची आहे.त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले.तर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी बोलताना परिस्थिती नियंत्रणात आहे.पोलीस प्रशासन परिस्थिती वर नियंत्रण ठेवून आहे असे सांगितले.
कोल्हापूर मध्ये काल आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाली होती. हिंदुत्ववादी संघटनेने यावर आज कोल्हापूर बंदची हाक दिली होती. त्यानुसार आज कोल्हापूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.सर्व व्यवहार दुकाने बंद होती. रस्त्यावर तणावपूर्ण शांतता होती.
हिंदुत्ववादी संघटनेने काल कोल्हापूर मध्ये झालेल्या आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणी कोल्हापूर बंदची हाक दिली होती.त्यामुळे आज कोल्हापूरमध्ये सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला होता. दुकाने व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवून या बंदमध्ये सहभाग नोंदविला होता. यामुळे आज बाजारपेठेतील कोट्यावधी रुपयांची उलाढाल ही ठप्प झाली होती. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते.लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ मार्केट,महाद्वार रोड,महानगरपालिका परिसर,पापाची तिकटी,मटण मार्केट,बिंदू चौक परिसर, शाहूपुरी पाच बांगला भाजी मंडई कोल्हापूर शहरातील विविध भागांमध्ये सर्व व्यवहार बंद होते. नागरिकांनी घराबाहेर न पडणे पसंद केले