no images were found
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत वृक्षारोपण
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार व प्रमुख, जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता बी. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा न्यायालय, कोल्हापूर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
वृक्षारोपणाची सुरुवात श्रीमती कविता अग्रवाल यांच्या हस्ते रोप लावून करण्यात आली. त्यावेळी कोल्हापूर मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रितम पाटील यांनी केले.