
no images were found
आगामी लोकसभा आणि विधानसभा भाजप शिवसेना युत्ती एकत्रित लढणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
भाजप आणि शिवसेना आगामी सर्व निवडणुका युतीने लढविण्याचा निर्णयघेतला असल्याच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीत सागितले आहे .
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. रात्री त्यांची बैठकही पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.
कृषि, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री शाह यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याने आम्ही ही भेट घेतली असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
या निवडणुकांमध्ये लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश होतो. याबाबतचा निर्णय अमित शहांसोबतच्या बैठकीत झाला. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.